कोरोना संसर्ग: घरी परतलेल्यांचे दारी लागतील पोस्टर
नागपूर:- केंद्र आणि राज्य सरकारकडून घरगुती उड्डानांस परवानगी देत लॉकडाउन 4 काही अंशी शिथिल करत दिलासा दिल्या गेला मात्र यामुळे परतलेल्यांमुळे कोवीड संसर्ग फैलाव होऊ नये म्हणून विमानांतून आलेल्यांना 14 दिवसांपर्यंत क्वारंटाइनची अट ठेवल्या गेली आहे. याचे उल्लंघन होऊ नये म्हणूनच्या उपायांसाठी अशांचे घराबाहेर पोस्टर् लावले जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त मुंढे यांनी दिली.
ते सांगतात की विमान, रेल्वे, बस आणि खाजगी वाहनांद्वारे लोक घरांमध्ये परतताहेत. शासकी दिशानिर्देशांनुसार अशांना 14 दिवस विलगीकरनात रहावे लागेल. अशा सर्व लोकांच्या घरांबाहेर पोस्टर लावले जातील.
नियम तोडल्यास क्वारंटाईन सेंटरमधे रवानगी:
आयुक्तांनी बजावले होम क्वारंटाईन केलेल्यांवर शिक्के लावलेयत असे लोक जर बाहेर वावरतांना आढळले तर क्वॉरंटाईन सेन्टरला त्यांची रवानगी केली जाईल, शहरात येणा-या अशा लोकांमुळे संभ्रमावस्था आहे. राज्य सरकारच्या दिशानिर्देशांनूसार शहरात प्रवेशताच अशा लोकांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचे शिक्के लावले जाताहेत, अशांस 14 दिवस घरातच रहायचे आहे. घरांवर लावले जात असलेले पोस्टरवर या लोकांच्या नावाची नोंद असेल. असे लो कुठेही फिरतांना आढळल्यास त्याची माहिती मनपा कंट्रोल रूमचे दूरध्वनीवर द्यावी, यांचे क्रमांक 0712-2567021 आणि 0712-2551866 आहेत.
खाजगी हॉस्पिटलांतही जाण्याची मुभा:
घरांत क्वारंटिन लोकांस ताप, खोकला आणि श्वास संबंधी त्रास झाल्यास त्वरित मनपाचे प्राथमिक आरोग्य केंद्रांस किंवा कोणत्याही खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांकडून तपासणी करावी. खाजगी हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचे लक्षणं आढळताच रूग्नाचे स्वॅब नमुने घेत अहवाल येईपर्यंत संबंधितास आयसोलेशन करून ठेवावे लागेल. रिपोर्ट पॉजिटिव मिळाल्यास ही माहिती त्वरित मनपास द्यावी लागेल.