नागपूरातल्या अनेक प्रतिबंधित क्षेत्रात होतोय लोकविरोध
नागपुर: सतत वाढत्या करोना पॉझिटिव्ह रूग्नांच्या घटनांमुळे बरेच परिसर हॉटस्पॉट ठरवत सिल केले गेलेयत अशात नागपुरातील मोमीनपुरा, सतरंजीपुरा नागपुरातील सर्वात मोठे हॉटस्पॉट बनलेयत मात्र मागील काही दिवसांत सतत नागरिकांचा विरोध वाढत आहे व या सिलबंदी विरोधात नागरिक या प्रतिबंधित क्षेत्राबाहेर गटात बाहेर पडून सामुहिक विरोध प्रदर्शन करताहेत.
नागपुरातील प्रतिबंधित क्षेत्राच्या घोषणांनंतर सदर स्थळांचे मार्ग बंद केले आहेत या विरोधात तेथील नागरीक एकत्र जमत रस्ते मोकळे करण्याची मागणी करताहेत, नागरिकांच्या मागण्यांत दुकानं, क्वारंटाइन सेन्टरमधील भोजन गुणवत्ता सुधार अशा आहेत, यासाठी
लोक सडकेवर उतरले आणि येथे उपस्थित पोलिसांसमोरच विरोध करू लागले, पोलिसांनी रहिवाशांस समजावण्याचा यत्न केला तरी लोक समजण्याचे मनःस्थितित नव्हते व निरंतर विरोध प्रदर्शन करत होते, अशी स्थिती पांढराबोडी, पार्वतीनगर, मोमीनपुरा या भागांत घडते आहे.
नियमांनुसार कोरोना पॉझिटिव्ह रूग्न आढळलेल्या परिसरास प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले जाते, केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे निर्देशानुसार प्रथम रूग्न पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पुढील 28 दिवसांपर्यंत संबंधित क्षेत्रास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून ठेवावे लागत असे. या 28 दिवसांना 14-14 दिवसांत विभागून आधीचे 14 दिवस अॅक्टिव्ह काळ आणि नंतरचे 14 पॅसिव्ह काळाच्या रूपात निर्धारना करत प्रतिबंधित क्षेत्रांत राबवले जातात. दोन्हींत वेगवेगळ्या त-हेने संक्रमनाच्या शक्यता असतात म्हणून 28 दिवस प्रतिबंधित असतात, पण हा दिर्घ कालावधी असल्याने स्थानिक नागरीक याविरोधात प्रदर्शनासाठी वेगवेगळ्या भागांत पोलिसांसमोरच रस्त्यांवर उतरत आहेत.