Informative

आता व्हाट्सअपचाही देशी पर्याय

लॉकडाऊन 4 चे सुरुवातीच्या काळात मा. पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भर व स्वदेशी चळवळीच्या आवाहनानंतर सर्वच बाबींत लोक स्वदेशी पर्याय शोधत आहेत, सोशल मिडियावर तर अशा आवाहनांचा व प्रतिक्रियांचा पूर ओसंडलाय, असाच देशी पर्याय व्हाट्सअप या मैसेंजर अॅप करीताही सुरू झालाय

व्हाट्सअप सर्व अँड्रॉईड फोन वापरकर्त्यांच्या अंगवळणी पडलंय त्याऐवजीचे सध्या उपलब्ध असलेले सर्व पर्याय वापरूनही लोक परतून त्यावरच आले पण व्हॉट्‌सऍपची जागा घेऊ शकेल असा भारत मॅसेंजर नावाचा हा नवा मॅसेंजर वाराणसीत जन्माला आलेला आहे. यात 16 ते 50 एमबीपर्यंतचा व्हिडिओ पाठविता येणार आहे. वर्ड, एक्‍सेल व ऍडोबच्या फाइल पाठविता येणार असून, ऍप वापरण्याची पद्धत व्हॉट्‌सऍप सारखीच आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत उदयाला आलेल्या व्हॉट्‌सऍपने जगभरात वेड लावले, अल्पावधीतच या ऍपने प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये स्थान पटकवीले. व्हॉट्‌सऍपने केवळ जगभरातील लोकांच्या जीवनशैलीत  बदल घडविले. याचे महत्त्व ओळखत फेसबुक चे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांनी त्या काळातला सर्वात महागडा करार करत ही ॲप ताबडतोब विकत घेतली, म्हणून सद्य याची मालकी फेसबुक कडे आहे मात्र, आता स्वदेशीचा पुढाकाराचे समर्थनात व चीनचे संशयास्पद  पाऊल पहाता, तसेच थ्री इडियट ज्यांच्यावर आधारित आहे असे सोनम वांगचूक यांनीही नुकतेच भारतीयांना चिनी प्रॉडक्ट बॉयकॉट करण्याचे आवाहन सोशल मीडियावर केले अशा परिस्थितित चीन उत्पादीत वस्तूंना बॉयकॉट केले जात आहे.

याचाच एक भाग म्हणून नागरिकांनी मोबाईलमधील चीनी बनावटीचे ऍपही अनइन्स्टॉल करणे सुरू केलेय. याचा ब-याच चिनी अॅप निर्मात्या कंपन्यांवर परिणाम झालाय, अशात आता व्हॉट्‌सऍप मॅसेंजरलाही पर्याय उपलब्ध झाला असल्याने भारतीयांनी भारत मॅसेंजरला पसंती दिलेली आहे.  प्ले-स्टोअरवर ही अॅप सहज उपलब्ध असून, डाउनलोड करण्यासाठी अवघी 51 एमबीची जागा लागते. आत्तापर्यंत एक लाखाहून अधिक युझर्सने अॅप डाउनलोडही केलीय.

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.