रस्त्यावर वाढली वर्दळ: लॉकडाउन -4 समाप्तीने लोकांत आढळतोय उत्साह
नागपूर:- मागील 70 दिवसांहून जास्त काळ आपांपल्या घरांत अडकलेल्या नागरिकांना लॉकडाउन -4 समाप्तीची, शासन संपूर्ण सवलत देईल या अपेक्षेची वाट होती. केंद्राने ब-याच मोकळीकी दिल्यायत मात्र राज्य सरकारच्या सूचनांवर नगर प्रशासनाने लॉकडाउन -4 कायम राखण्याची घोषणा केली.
1 जून रोजीच्या शहरातील रस्त्यांवरील हालचाली बघता आधी वैरान रस्ते गजबजले होते. बाजारपेठा फुलल्या दिसत होत्या, मोठ्या संख्येने लोक वाहनांवर फिरतांना दिसले. कोवीड19 संसर्गाच्या बचावासाठी आता नागरीक स्वतःच सोशल डिस्टंस व इतर उपाययोजनांचे पालन करण्याचे समर्थनात दिसताहेत. कारण सर्वांस कल्पना आलीय की जोवर यावर लस वा प्रभावी औषध ये नाही तोवर यासंगेच जगायचेय. किती काळ घरांमध्ये बंद रहाणार, व्यापार बंद ठेवणार, उद्योग बंद राखणे वगैरे शक्य नाही.
बाजारपेठांत फिरा पण…
जूनच्या 1 तारखेपासून शहराच्या बाजारपेठांत सकाळपासूनच गर्दी लक्ष वेधून घेत होती. महाल, सदर आणि सिताबर्डी बाजारांतली मनपाचे पथक येताच बंद केल्या गेली. काही दूकानदारांविरूध्द दंडाची कार्यवाहीही झाली. ईतवारी आणि महाल भाग संपुर्ण बंद होता. सिताबर्डी पहाटे काही फुटपाथ विक्रेतेही दूकान लावून बसले, परंतु पथकाने त्यांना उठवले. सदर मार्केट परिसरही संपुर्ण बंद होता, तरी लोक मोठ्या प्रमाणात बाजारांत घिरट्या घालत होते.
फुटाळ्यात गजबज: मागील 2 महिन्यांहून अधिक काळापासून वैरान फुटाळा तलाव परिसराचीही स्थिती पुर्वपदी येण्याचे संकेत येथील नागरिकांच्या उपस्थितिमुळे जाणवतेय.
हवामान बदलानेही यात मदत केलीय. सकाळपासून सूर्याने दर्शन न देता ढगाआड रआहणे पसंत केल्याने व पावसाच्या हलक्या सरींनी तरूणाईत उत्साह संचारला. पोलिसांचीही आधीसारखी सक्ती नसल्याने हा आवडता परिसर अल्पावधितच फुलला, या काही कुटूंबियही फिरायला आलेले आढळले. लहानग्यांनी बर्याच दिवसांनंतर असा शहर सफारीचा आनंद घेतला.