Informative
गृहमंत्र्यांचा थेट संवेदनस्थळांत आढावा
आज सायंकाळी मा.गृहमंत्री,श्री. अनिल देशमुख यांनी मा.पोलीस आयुक्त डॉ.श्री.भूषणकुमार उपाध्याय यांच्यासोबत नागपूर शहरातील प्रतिबंधित क्षेत्र ज्यामध्ये तांडापेठ-नाईक तलाव-शांतीनगर-हिवरी नगर-श्रीकृष्ण नगर,वाठोड – गड्डी गोदाम इ. ठिकाणी भेट देऊन तेथील लॉकडाऊन परिस्थितीबाबत नागरिकांशी विचारपूस करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतली तसेच या भागातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. सदरवेळी मा.पोलीस उपायुक्त, (परि.क्र.३) श्री. राहुल माकणीकर ,मा.पोलीस उपायुक्त(परि क्र ४) श्रीमती निर्मला देवी, मा.पोलीस उपायुक्त(परि क्र 2) श्रीमती विनिता साहू हे उपस्थित होते.