नागरिकांना भेडसावताहेत समस्या: आता ‘आपली बस’ सुरू करा
नागपूर:- अनलॉक -१ अंतर्गत हळूहळू बाजार परिसर, खासगी कार्यालये, दुकाने, बांधकाम कामे इत्यादी टप्प्याटप्प्याने उघडल्या गेली. शहरात पुन्हा जीवन रुळावर यायला सुरुवात झालीय. अडीच महिने गृहवास भोगलेले लोक घराबाहेर पडू लागलेयत. कामगार वर्ग, दुकाने, व्यवसाय ऑफिसेस, नोकरदार, संस्था, खाजगी कार्यालये इत्यादी ठिकाणी काम करणारे हजारो लोक कामावर जाऊ लागले आहेत, पण आता त्यांना ये-जा करण्याचे समस्येस सामोरे जावे लागते आहे.
बरेच लोक सिटी बसने जायचे मात्र “आपली बस” तुर्त बंद आहे. ज्यांचेकडे दुचाकी वाहने नाहीत त्यांना याचा चांगलाच त्रास होत आहे. कसे तरी सायकलची व्यवस्था करून ते कामाच्या ठिकाणी पोहोचताहेत. अशांस आपली बस सुरू होण्याची आतुरतेने वाट आहे. शहरातील हजारो लोकांच्या वाहतुकीचे मुख्य आणि स्वस्त साधन आपली बस आहे परंतु कोरोना लॉकडाऊनमुळे ती देखील बंद आहे. आपली बस वापरणारे नागरिक आता ती सुरू करण्याची मागणी करताहेत.
सोशल डिस्टेंस चे अनुसरण: नागरिकांनूसार आपली बस सेवा त्वरित सुरू करावयास हवी, परंतु सोशल डिस्टेंस पालन त्यात केले जावे. कमी प्रवाशांना बसमध्ये बसण्याची परवानगी देण्यात यावी आणि त्याचबरोबर बसमध्ये मास्क वापरणे बंधनकारक केले पाहिजे. शहरात सध्या दुकाने, बाजारपेठा, उद्योग, छोटे कॉटेज उद्योग, खाजगी कार्यालये सुरू झाल्याने याकडे जाणारे कामगारांना सिटी बस बंद असल्यामुळे अडचणी येताहेत.
सुरक्षा उपाय योजनाः आपली बस वापरणार्या नागरिकांचे म्हणणे आहे की दररोज बसेसची स्वच्छता करता येईल. बसमध्ये चढणार्या प्रवाश्यांसाठी सॅनिटायझरचीही व्यवस्था केली पाहिजे. जर आपल्याला कोरोनाबरोबर राहण्याची सवय लावायचीच आहे तर उपाययोजनाद्वारेच सर्व व्यवस्थाही सुरू कराव्या लागतील. आपली बस शहरातील हजारो लोकांच्या वाहतुकीचे एकमेव साधन आहे. लोकांस ऑटो इत्यादीचे किंमती परवडत नाहीत. मनपा आयुक्तांनी लवकरात लवकर सिटी बस सेवा सुरू करावी. अशी मागणी होतेय