मास्कविना फिरणा-या 9 जणांवर गुन्हा दाखल

नागपूर:- कोरोना संसर्गकाळात शासनाने ईतरांची व स्वनिगा राखण्यावर काही नियमावलीचे पालनाची व दक्षतेची जवाबदारी सर्वांकडून अपेक्षीली असतांना काहि बेजबाबदार मात्र याविषयी बेपर्वाई दाखवत असल्याचे चित्र आहे, असेच काही तरूणांस काल पोलिसांनी चांगलाच हिसका दिलाय.
फुटाळा व अंबाझरी तलाव परिसरात मास्क न घालता फिरणार्या 9 तरुणांवर अंबाझरी पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा आरोप आहे की हे लोक मास्क न लावता फुटाळा तलाव आणि अंबाझरी भागात फिरत असल्याचे आढळले. यावेळी पोलिसांनी 3 वाहनेही जप्त केली. पोलिस उपायुक्त विनिता साहू यांना याबद्दल प्रथम माहिती मिळाली.
त्यानंतर त्यांनी अंबाझरी पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. अंबाझरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय करे, सहायक निरीक्षक अरविंद घोडके, सहायक उपनिरीक्षक दीपक अवचित आदींनी ही कारवाई केली.