लर्निंग लायसन्ससाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ
नागपूर:- कोरोना संसर्गप्रतिबंधक संचारबंदी मुळे शिकाऊ परवानाधारकांचा कालावधी वाढविण्यात आला आहे. ज्यांचे परवान्याची तारीख एप्रिल, मे मध्ये संपणार होती. त्यांना आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देऊन दिलासा मिळाला आहे. म्हणजेच लर्निंग लायसन्सधारकांना पुन्हा ऑनलाईन चाचणीला सामोरे जावे लागणार नाही.
अधिकृत आकडेवारी बघता शहरात 12 लाखाहून अधिक वाहने आहेत. ती वाहने चालविण्यासाठी परवाना आवश्यक आहे. अशा परिस्थितीत वाहनधारकांना आरटीओ कार्यालयात कागदपत्र इत्यादींची प्रक्रिया पूर्ण करून परवाना घ्यावा लागतो. या प्रक्रियेत प्रथम, परवान्यासाठी ऑनलाईन तारीख घ्यावी लागते. मग या तारखेला ऑफिसमध्ये जाऊन परीक्षा ऑनलाइन द्यावी लागते. यानंतर कार्यालयाद्वारे 6 महिने शिकाऊ व नंतर कायम परवाना दिला जातो.
वाहनधारक चाचणी उत्तीर्ण झाला तरच त्याला परवाना देण्यात येतो. शिकाऊ परवाना 6 महिने टिकतो. पण बर्याच काळापासून कोविड19 मुळे संपूर्ण देश ठप्प झाला. तसे आरटीओ कार्यालयही बंद आहे. यामुळे, शिकाऊ परवाने कालबाह्य होणार होते. व पुर्वनियमाने अशांना पुन्हा ऑनलाईन परीक्षा द्यावी लागली असती. पण आता अशांसाठी दिलासादायी बातमी आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा सर्वांना दिलासा दिला आहे. शिकाऊ परवानाधारकांना 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.