एका दिवसातला सर्वाधिक आंकड़ा: आज पुन्हा 85 पॉझिटिव्ह ची भर
नागपुर:- नागरिकांच्या सोयीकरीता हळूहळू लागू केले जात असलेले अनलॉक 1 करोना रूग्णसंख्या वाढीत मात्र जोमाने हातभार लावत असल्याचे चित्र दिसते आहे, शहरातली आजची बाधितांची संख्या काळजीत टाकण्या ईतपत फुगली आहे, मुख्यमंत्र्यांनीही आज काळजीपोटी पुन्हा लॉकडाऊन करावे कि काय? अशी भाषा वापरली आहे.
नागपूरातली आजची आकडेवारी:
- 85 पॉझिटिव्ह
- 87 निगेटिव्ह
- 17 सुधार
- 00 मृत्यू
यातील: 61 वेटरनरी लॅबोरेटरी (नाईक तलाव, बांग्लादेश, विएनआयटी), 15 मेडिकल लॅबोरेटरी (पाचपावली विलगीकरण केंद्रात असलेले), 6 सतरंजीपुरा, 9 नाईक तलाव, बांग्लादेश, 9 एआयआयएम्स लॅबोरेटरी (एमएलए विलगीकरण केंद्रात असलेले), 7 ईसासनी, हिंगना, 2 नाईक तलाव, बांग्लादेश असे जाहिर करण्यात आले आहेत.
या आकडेवारीमुळे कालच्या नागपुरच्या बाधित संख्या 777+85 अशी भर पडत एकुण 862 वर पोचलीय. नागपूरात जास्त प्रमाणात रूग्ण आजारापासून यशस्वीरित्या बरे झाले आहेत आणि सुरक्षितपणे घरीही परतले आहेत, तरी नागपुरातील नागरिकांनी याबाबत अधिक जागरूक व दक्ष रहाण्याची गरज असल्याचे तिव्रतेने जाणवतेय.