योग पळवी रोग: जागतिक योग दिनानिमित्त पोलिस मुख्यालयी शिबिर
उर्मिला ताई जुवारकर यांनी केले मार्गदर्शन
प्रतिनिधी जोत्सना इंगळे नागपूर
नागपूर:- सहाव्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने शहर पोलीस मुख्यालय येथील शासकीय पटांगणात 21 व 22 जुन असे दोन दिवसीय योग सत्राचे आयोजन महिला पतंजलि जिल्हा नागपूर च्या प्रभारी उर्मिला ताई जुवारकर व जिल्हा योगशिक्षक राजेंद्र जी जुवारकर यांनी 21व 22 जुन हे दोन दिवशीय योगशिबिर घेऊण पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना योग,प्राणायाम, सुक्ष्म व्यायाम,आसन आदिंची माहिती देत सदर सराव मानवी शरिरा करिता कीती आवश्यक आहे यासंबंधीची सविस्तरपणे माहिती देत उपस्थितीतांकडून प्रात्याक्षिके करवून घेतली याप्रसंगी डीसीपी पोलीस आयुक्त मा.राजमाने साहेब पोलीस मुख्यालय हेड कॉर्टर तसेच आर पि आय सिंग,पी .एस.आय राठोडसह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.सोबत वरिषि योग शिक्षिका ज्योत्स्ना इंगळे मीडिया प्रभारी नागपूर,योग शिक्षिका सुरेखा नवघरे आदिंनी सहकार्य केले.सर्व पोलीस कर्मचारी यांनी सदर आयोजनास उत्सफुर्त प्रतिसाद देऊण योग,प्राणायाम, व आसनांचे महत्व जाणून घेत जागतिक योग दिवस उत्साहात साजरा केला.