महापौर संदीप जोशींच्या विरोधात आम आदमी पार्टीची पोलीस तक्रार
आज कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये आम आदमी पार्टीने महापौर संदीप जोशींच्या विरोधात पोलीस तक्रार केली. आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत राज्य सरकारनी काहाडलेल्या आदेशा अनुसार पांनास लोकांन पेक्षा जास्ती लोक जमण्यास मनाई आहे. नागपुत महानगर पालिकेची सभा राज्य सरकार च्या विशेष परवानगी घेऊन घेण्यात आली आहे.
मनपाची सभा गेल्या पाच दिवसान पासना सुरू आहे. राज्य सरकारची परवानगी देखील महामारी काळात महत्वाचे निर्णय व मुद्दे घेण्यासाठी दिली गेलेली आहे. किरकोळ बाबींन वर्ती चर्चा करून रोज सभा दुसऱ्या दिवशी ढकलन्यात येत आहे. रोज १५० पदाधिकारी, ५० मनपा कर्मचारी, पोलीस ताफा व अन्य लोक मिळून जवळपास ३०० ते ४०० लोक कोविड काळात एका ठिकाणी जमा होत आहेत. सगळे मनपा पदाधिकारी त्यांच्या प्रभागात जाऊन लोकांना भेटतात. ह्या सभेमुळे पूर्ण नागपूर शहरात कोरोना विषाणू फाईलण्याची भीती निर्माण झाली आहे.
ही सभा नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी बोलावली. नागपूरचे कार्यक्षम मनपा आयुक्तांन विरोधात अहंकार पोटी ही सभा बोलावण्यात आली आहे. ही सभा लोकांसाठी धोकादायक आहे म्हणून आम आदमी पार्टी या सभेचे निषेध करते. ही तक्रार देतांना आम आदमी पार्टीचे विदर्भ संयोजक श्री देवेंद्र वानखडे, नागपूर संयोजक श्रीमाती कविता सिंघल, राज्य सहासचिव श्री अशोक मिश्रा, महाराष्ट्र युवा कमिटी सदस्य कृतल वेलेकर, विदर्भ युवा संयोजक पियुष आकरे, नागपूर युवा संयोजक गिरीश तितरमरे, सचिव भूषण ढाकुलकर, नागपुत संगठन मंत्री श्री शंकर इंगोले, प्रभात अग्रवाल, ओम आरेकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
अस्सल नागपुरी भाषा है पत्रकार महोदय जी धन्य है