अनलॉक-2: दुकाने आता सायंकाळी पाच वाजेपर्यंतच: आयुक्तांचे आदेश जारी
नागपूर:- राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनलॉक -02 निर्देशांनंतर लगेच पालिका आयुक्त मुंढे यांनी शहरासाठीचे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जरी अनलॉक -01 मध्ये संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकानांना परवानगी देण्यात आली असली, तरी आता अनावश्यक वस्तूंची दुकाने केवळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच उघडण्याची परवानगी असेल.
मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सवर पूर्वीप्रमाणे बंदी लागू आहे. याशिवाय पूर्वीप्रमाणे होम डिलिव्हरीसह दारूविक्री सुरू राहणार आहे. पूर्वीच्या आदेशात सूट मिळालेल्या युनिट्सनाही त्याच पद्धतीने कार्य करावे लागेल, असे या आदेशात स्पष्ट केलेय.
शासकीय कार्यालयांवर आधीप्रमाणेच बंदी: जिवनावश्यक, आरोग्य, वैद्यकीय, पोलिस, आणीबानी, अन्न व पुरवठा विभाग, मनपा सेवा वगळता अन्य सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के किंवा 15 चे उपस्थिती क्षमतेत कार्य करावे लागेल तर खासगी कार्यालये केवळ 10 टक्के हजेरी किंवा 10 जणांच्या उपस्थितीत सुरू करण्यास सक्षम असतील. पूर्वी दिलेल्या परवानगीनुसारच टॅक्सी, ऑटोरिक्षा, चारचाकी आणि दुचाकी सेवा चालवता येतील.
समारंभात 50 चीच परवानगी: आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले की कोणत्याही प्रकारच्या समारंभात 50 हून अधिक लोकांना परवानगी दिली जाणार नाही. 23 जून रोजी विवाह सोहळ्याच्या संदर्भात लॉन, एअरकंडिशन हॉल इत्यादी संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचे अनुसरण करणे पुढेही आवश्यक असेल. अनावश्यक साहित्याची खरेदी व विक्री करण्यासाठी लांब पल्ल्याच्या प्रवासालाही परवानगी दिली जाणार नाही. फक्त जवळच्या बाजारातून तशी खरेदी करावी लागेल.
विद्यापीठ, महाविद्यालय किंवा शाळा यासारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये ई-विषयकसाठी, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल जाहीर करण्यास घडामोडी साठीच परवानगी असेल. 27 जून रोजी दिलेल्या अटीनुसारच सलून आणि ब्युटी पार्लर चालवता येतील.