COVID-19

व्यापा-यांची करोनारोधी टास्कफोर्स : मुंढेंनी घेतली बैठक

नागपूर:- कोरोना साखळी तोडण्यास लॉकडाउन हाच अंतिम पर्याय असू शकतो, परंतु आत्म-शिस्तीनेही कोरोनाला शहरात पराभूत करता येईल. यासाठी शहरातील व्यापारी संघटनेच्या पदाधिका-यांनी मनपासह टास्क फोर्स निर्मितईचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करून मनपा आयुक्त मुंढे यांनी शहर कोरोनामुक्त करण्याचे आवाहन केले. मिशन बिगिन अगेन अंतर्गत लॉकडाउन पश्चात चालू बाजारपेठांत होणा-या गर्दिने शहरातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली असल्याचे निदर्शनास येते आहे.

या संदर्भात आयुक्तांनी विविध व्यापारी संघटनांच्या अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, सहाय्यक आयुक्त उज्ज्वल लोया, अन्न व औषध प्रशासन सहा. आयुक्त अभय देशपांडे, शरद कोलते, नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, कॅट चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतीया उपस्थित होते.

एनसीसीएलचे विष्णू पचेरीवाला, राम अवतार तोतला, रेडीमेड मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रितेश मोदी, जागनाथ रोड क्लॉथ मार्केट असोसिएशनचे सचिव कल्पेश मदन, स्टील अँड हार्डवेअर चेंबर ऑफ विदर्भचे अध्यक्ष राजेश लखोटिया, सचिव संजय अग्रवाल, एनएचआरएचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू, नागपूर जि. ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव हेतल ठक्कर, नागपूर सराफा असोसिएशनचे राजेश रोकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव संजय शिरपूरकर, व्हीटीएचे उपाध्यक्ष हेमंत त्रिवेदी, एनसीसीएलचे सचिव तरुण निर्बान उपस्थित होते.

व्यापा-यांनी पुढे यावे: मनपा आयुक्तांनी बैठकीत सांगितले की, लॉकडाउनमधे सुट नियमांनुसार देण्यात आली पण बाजारांत दुकानदारच त्याचे पालन करत नाहीत. व्यापा-यांनी शिस्तीचे पालन करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. जरी दुकानांमध्ये नियमांचे पालन केले गेले तर कोरोनाचा प्रसार रोखण्यात मदत होईल. ग्राहकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वत: पावले उचलावीत असे आवाहन मुंढे यांनी केले.

त्यानंतरही, जर कुणी नियम न पाळल्यास त्याच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल. व्यापारी संघटनांच्या अधिका-यांनी कोविड 19 नियंत्रणासाठी कोविड राजदूत म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली. ते म्हणाले की, प्रशासनाच्या नियमांमुळे व्यापा-यांच्या बर्‍याच कर्मचार्‍यांना घरी बसावे लागले अशांना सोबत घेऊन व्यापारी संघटना टास्क फोर्स तयार करेल. ही शक्ती दुकानांमध्ये जाऊन सोशल डिस्टंसींगसाठी, मास्क लावण्यासाठी, बाजारातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी मनपाला सहकार्य करेल. मनपाच्या वतीने सहकार्याचे आश्वासन आयुक्तांनी टास्क फोर्सला दिले.

तर 15 ऑगस्टपर्यंत कोरोना शहराबाहेर:

आयुक्तांनी सांगितले की व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिल्यास कोरोना शहराबाहेर काढण्यास वेळ लागणार नाही. 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन हा नागपूरकरांसाठी कोरोना मुक्ती दिन असावा, असे ठरवून व्यापा-यांनी काम करण्याचे आवाहन केले. संघटनेच्या अधिका-यांनीही लवकरच याबाबत योजना आखण्याचे आश्वासन दिले.

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.