स्वत:स सुधारा अन्यथा कर्फ्युसह लॉकडाऊन: मुंढे
नागपूर:- गेल्या कैक महिन्यांपासून देशातील समस्त जनता वाट पाहतेय की कधी एकदा या कोरोनापासून कायमची मुक्ती मिळेल, व आधीप्रमाणे सहज जिवन जगाया मिळेल परंतु जोपर्यंत सर्वसामान्य जनता स्वत: नियमांचे काटेकोर पालन करत नाही तोपर्यंत आपण कोरोनापासून कसे मुक्त होऊ, जर सरकार घरातच रहा, सामाजिक अंतराचे अनुसरण करा म्हणत असेल व आपण जर का सामाजिक अंतराचे अनुसरण करत नसू तर? जनतेनेही नियमांचे पालन केले पाहिजे, परंतु असे होत नाही.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की नागपुरात कोरोणा मृत्यूची संख्या वाढली आहे, सर्वसामान्य लोक नियम पाळत नाहीत आणि रोगाची अजूनही लपवणूक करताहेत ज्यामुळे नागपुरात आकडेवारी वाढत आहे, तरी येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
पण याच वेगाने आंकड़े वाढत राहिल्यास येथे 10 हजाराहून अधिक रुग्ण व्हायला जास्त वेळ लागणार नाही, आणि जर हे असेच चालू राहिले तर मी केवळ लॉकडाउनच करणार नाही तर कर्फ्यू देखील लावणार आहे. दुकानांत 5 ऐवजी 10 लोक वावरत आहेत, मी स्वत:च हे पाहिले आहे, पदपथांवर गर्दी आहे, ऑटो रिक्षांना परवानगी नाही, तरीही ते अंदाधुंदपणे सुरू आहेत. एकाऐवजी मोटारसायकलवर दोन ते तीन लोक असतात, मास्कचा वापर केला जात नाहीय.
आता आगामी लॉकडाउन 14, 15 दिवसांचा असेल आणि लोकांना 2/3 दिवस आगाऊ माहिती दिली जाईल. लॉकडाउन झाल्यास कुणीच घराबाहेर पडू शकणार नाही. नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत नागपूरकरांना ही सूचना दिली आहे.