नागपुर:- आज आम आदमी पार्टी च्या ऑटो संघटने ने मनपा आयुक्त श्री तुकाराम मुंडे यांना ऑटो रिक्शा सेवा सुरु करण्या बद्दल निवेदन दिले. सम्पूर्ण जगात कोरोनाचा थैमान सुरु आहे. नागपुर शहरात देखील कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. या मुळे पूर्ण जगाची आर्थिक परिस्तिति गंभीर झाली आहे. नागपुरात ही लोकांना आर्थिक झळ जाणवली आहे. यात समाजाच्या आर्थिक दृष्ट्या सगळ्यात कामजोक अंगाची विकट परिस्तिति आहे.
नागपुर मध्ये ऑटो रिक्षा सेवेन वर्ती कोरोना मुळे बंदी आहे. याच बरोबर टैक्सी सेवा सुरु आहे. या टैक्सी वातानुकूलित आहेत आणि यात कॉन्टेक्ट सरफेस सुद्धा ऑटो रिक्षा हुन जास्ती आहे. वैद्यकीय दृष्टया ऑटो रिक्शा जास्त सुरक्षित आहे. ऑटो रिक्शा चालक हे समाजाच्या आर्थिक दृष्टया कमजोर तापक्यातुन येतो. मनपा आयुक्तनि या विषया बाबत विशेष दखल घ्यावी असे आम आदमी पार्टी ऑटो संघटनेची मागणी आहे.
हे निवेदन देतांना आम आदमी पार्टी ऑटो संघटनेचे समन्वयक श्री संजय अनासाने, नागपुर सचिव श्री भूषण ढाकूलकर, अब्दुल हाफिज, इमरान शेख, अब्दुल शाहिद व अन्य कार्यकर्ते उपस्तित होते. आम आदमी पार्टी ऑटो संघटने मार्फत ऑटो रिक्शा चालक यांच्या मुद्यना येणाऱ्या वेळात शासना समोर प्रखर पणे मांडनार.