मद्य पिण्याचे परवाने देण्यास व मिळविण्यात नागपूर महाराष्ट्रात अव्वल
नागपूर:- लॉकडाऊन शिथिलतेपासून सरकारने महाराष्ट्रात मद्य डिलिवरी करण्यास परवानगी दिली, व अद्याप ती अट कायमत आहे, मात्र यासह सरकारने ज्याचेकडे परमिट आहे त्यालाच होम डिलीव्हरीची अट राखली होती, दुसरीकडे उत्पादन शुल्क विभागानेही मद्य पिण्याचे परमिट देणे सुरू केले, त्यामुळे अशी परवानगी मिळवणा-यांची संख्या सातत्याने वाढती आहे आणि चर्चा अशी आहे की नागपूरने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मद्यपान परवान्यासाठी अर्ज केला असून नागपूरच्या उत्पादन शुल्क विभागाने केवळ परवान्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये याकाळात कमावलेत.
नागपुरात एकूण 37981 लोकांनी या परवान्यासाठी अर्ज केले आहेत, त्यापैकी 36910 लोकांना दारूचे परमिट देण्यात आले असून विशेष म्हणजे यामुळे महाराष्ट्रात नागपूरच्या उत्पादन शुल्क विभागाला 1,51,36,,305 रुपये मिळाले आहेत. दुसरा असा कोणताही जिल्हा नाही जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात परवाने मागीतले व लागू केल्या गेलेत, अगदी एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येच्या शहर मुंबईतही 24027 जणांनीच परमिटसाठी अर्ज केले आहेत, दारू परवाने देण्यासाठी आणि घेण्यास नागपूर अव्वल स्थानावर आहे. आता यास नागपूरच्या नावावर रेकॉर्ड ठरवावा की येथील पिणा-यांचे सध्याचे कमकुवत अर्थव्यवस्थेस प्रामाणिक योगदान! वाचकांनीच काय ते ठरवा!