आरोग्य विभाग जिल्हा परिषदेत कोरोना, घाबरलेल्या कर्मचार्यांत संताप
नागपूर:- जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागात कोरोनाचा पाश पोहोचला आहे. विभागाचे अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. गेल्या 2 दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती. वैद्यकीय तपासणीत त्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आला.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील आणखी एक अधिकारीही पॉजिटिव्ह आढळले आहे.
काही दिवसांपूर्वीच तहसील कार्यालयात एक वरिष्ठ अधिकारी पॉझिटिव्ह आढळले, त्यानंतर तहसील कार्यालय बंद होते. परंतु जिल्हा परिषद विभागात पॉजिटिव्ह आढळून आल्यानंतरही कर्मचार्यांना ड्युटीवर बोलावले जात असल्याने त्यांच्यात भीती व संताप वाढतो आहे.
काही कर्मचार्यांनी त्यांच्या विभागप्रमुखांना सीईओ कुंभजेकर यांना काही दिवस कार्यालय सिल करण्याची विनंती केली आहे. भंडारा आणि अहमदनगर जिल्हा परिषदेत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संपूर्ण कार्यालय सीलबंद करुन काही दिवस स्वच्छता सॅनिटाईजेशन कामे करण्यात आली. परंतु येथे कोरोनापासून कर्मचार्यांचे रक्षण करण्यासाठी सीईओंनी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत.