तिरंगा मास्क वापरणाऱ्यांवर कारवाई?
स्वातंत्र्य दिनानिमित्त यंदा तिरंगा मास्क घालायचे नवीन फॅड आलेले आहे. मात्र, अशा पद्धतीने मास्क घालणे हा तिरंगा झेंड्याचा अपमान समजला जाईल व अशा पद्धतीने राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.
गेल्यां २ ~ ३ दिवसांपासून सोशल मीडियावर बहुसंख्य ठिकाणी तिरंगी रंगाचा झेंड्यासारखा असलेला फेस मास्क स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विक्रीस आलाय तो अजिबात घालू नका असे कळकळीने आवाहन केले जात आहे, फेसबुक, यु ट्यूब, वा व्हिडिओ माध्यम अथवा वृत्त माध्यमातही सर्व ठिकाणी सर्वच लोक कळकळीने त्याविषयकचे फोटो किंवा ते विक्रीस तयार असल्याचे फोटो शेअर करत 15 ऑगस्ट रोजी हे मास्क घालून देशाभिमान मिळवणार की देशाचा अपमान करणार आहोत? अशा आशयाचे वृत्तही त्या फोटोंसह फिरवत आहेत.
ब-याच ठिकानी प्रशासनाने हा मास्क घातल्यास व वापरल्यानंतर इतस्तत: फेकल्यास कारवाईचे संकेत दिले आहेत भलेही त्यामागची पेहरावाची भावना व उद्देश्य काहि का नसे ना? अनेक नेत्यांनी असे तिरंगा मास्क निर्मितिचे वृत्त समजताच त्याबाबत निषेध व्यक्त केलाय.
कंपन्या पैसा कमावण्याचे उद्देश्याने लोकभावना जानत तसे प्रॉडक्ट हंगामानुसार निर्मीती करतात पण हे प्रॉडक्ट अविचाराने बाजारात आलंय्, दुकानांत, मेडिकल्स स्टोर्स मधे ते उपलब्धही आहे.
या प्रॉडक्टला विरोध का? तर हा मास्क पेहेराव करणारे व्यक्ति वारंवार खोकून, छींकून उपयोगाअंती डस्टबिनला फेंकण्याचा संभव आहे, तिरंगा प्रत्येकच भारतीयाची आन बान शान मानल्या जातो करिता राष्ट्रीय ध्वजाचा पुर्ण सन्मान प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असल्या मास्कच्या वापरावर बहिष्कार टाकला जावा हि मागणी जोर धरतेय
तिरंगी मास्क स्वत: घालून राष्ट्रध्वजाचा अपमान तर करूच नका, मित्र-मैत्रिणींसोबतही शेअर करू नका, त्यांनाही घालू देऊ नका, विक्रेते, दुकानदारांनाही तो विकू देऊ नका, प्रसंगी त्यांची तक्रार करा. असा समंजस सल्ला सर्व जानकार व सामान्यही व्यक्त करत आहेत. सरकार ने ही याविषयक मनाई आदेश त्वरित प्रसारित करावा हि मागणी सर्वस्तरातून होते आहे