शहरात आता गुन्हेगारांनी थारा नाही: गृहमंत्री अनिल देशमुखांचे कठोर कारवाईचे संकेत
नागपूर:- राज्याखेरीज देशातही नागपूर शहरास क्राइम कॅपिटल म्हणून ओळखले जात असे, परंतु गृहमंत्री म्हणून मी शहराची बदनामी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अलीकडच्या काळात प्रसिद्ध गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांना तुरूंगात पाठविण्यात आले आहे. आता शहरात गुन्हेगारांना थारा नाही.
पुढेही अशीच सक्त कार्यवाही करत रहाण्याचे पोलिस विभागास कठोर पावले उचलण्याचे आदेश दिल्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
ते म्हणाले की सीपी बी.के. उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उत्कृष्ट काम केले जात आहे. शहरातील 118 गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करत आतापर्यंत 51 आराेपींवर कारवाई झाली. संतोष आंबेकर असो वा साहिल सय्यद, कोणीही पोलिसांच्या तावडीतून सुटलेला नाही. पोलिसांनी दोन्ही गुन्हेगारांचे भव्य बंगले नष्ट केले आहेत.
याशिवाय रोशन शेख, प्रीती दास, मंगेश कडव, तपन जयस्वाल आणि मादकपदार्थ गॅगस्टर अबू अण्णा यांच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जात आहे. मी स्वतःहून अनेक वेळा शहरात घडणार्या गुन्हेगारी घटनांचा आढावा घेतला आहे. शहरात मोकळेपणाने फिरणा-या बदमाशांची माहिती पोलिस अधिका-यांकडून मागवली गेली आहे, उत्तम गोष्ट म्हणजे आता शहरात असे गुन्हेगार उरले नाहीत.
अनिल देशमुख यांनी नागरिकांना आवाहन करत गुन्ह्यांविषयी, दोषींविषयी मला माहिती द्या अये सांगितले, परिसरामध्ये असा कुणी गुंड असेल तर त्यांची कुंडली घेऊन माझ्याकडे या. आरोपींविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. जर एखादा गुन्हेगार तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही रविभवनच्या कक्ष क्र .११ मधील शिबीर कार्यालयात ठाम पुराव्यांसह तक्रार देऊ शकता. 20 ते 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत विशेष कार्य अधिकारी डॉ.संजय धोटे यांच्याकडे तक्रार करून पुरावे सादर करु शकता. तक्रारदाराची माहिती, पुरावे आणि त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल. संबंधित प्रकरणांचा बारकाईने तपास करून आरोपींना तुरुंगात पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.