एएसआय संदीप शर्मा यांना राष्ट्रपति पदक
नागपूर:- ७४ व्या स्वातंत्र दिन औचित्यावर सहाय्यक उपनिरीक्षक संदीप मनोहर लाल शर्मा यांना पोलिस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानीत करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर केले आहे. या व्यतिरिक्त गडचिरोलीच्या १४ पोलिस कर्मचा-यांना विशेष कामगिरीसाठी पोलिस शौर्य पदक देऊन सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरचे संदीप शर्मा यांच्यासह विदर्भातील ४ पोलिस अधिका-यांना राष्ट्रपती पदक देण्यात येणार आहे.
३९ वर्षांच्या सेवेत २७० पुरस्कार व प्रमाणपत्रे:
संदीप शर्मा सध्या गुन्हे शाखेत (शोध) कार्यरत आहेत. क्राईम डेटा, क्राईम अॅनालिसिस आणि गुन्हेगारीशी संबंधित सर्व बाबींत त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. १९८२ मध्ये त्यांची पोलिस हवालदार म्हणून नियुक्ती झाली. यासह शहरातील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये त्यांना क्राईम संबंधि उल्लेखनीय कामांसाठी अनेक वेळा सन्मानित करण्यात आले आहे. २००६ साली झालेल्या अखिल भारतीय पोलिस ड्यूटी मिट मेळाव्यात त्यांनी भाग घेतला. त्याच वर्षी महाराष्ट्र पोलिस ड्यूटी मीट गुन्हे निरीक्षणामध्ये सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.
2012 मध्ये त्यांनी मानवाधिकार
आयोगाच्या वादविवाद स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. सन २०१८ मध्ये महाराष्ट्र पोलिस महाव्यवस्थापक राज्यात मुंबईला इन्सिग्निआ पदक देण्यात आले. ३९ वर्षांच्या सेवेत त्यांना २७० हून अधिक पुरस्कार व प्रशस्तिपत्रे मिळाली आहेत. या कर्तृत्वावर सी.पी. उपाध्याय, माजी जॉइंट सीपी रवींद्र कदम, जॉइंट सीपी निलेश भरणे, डीसीपी गजानन राजमाने, मकणीकर, संभाजी कदम, श्वेता खेडकर, एसीपी नंदनवार, जाधव यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचार्यांवतीने शुभेच्छा देण्यात आल्या.