कोरोना रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयात ५७५ खाटा उपलब्ध
बैठकीच्या सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) डॉ.योगेन्द्र सवाई यांनी खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २४ खासगी रुग्णालयांमध्ये १८७६ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या सद्य:स्थितीत खासगी रुग्णालयात ५७५ बेडस उपलब्ध आहेत. इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये १२०० खाटांची व्यवस्था आहे. जीएमसी मध्ये ६०० बेडस आहे त्यात ३४० रुग्ण भरती आहे, आयजीएमसी मध्ये ६०० बेडस आहे त्यात २९५ रुग्ण भरती आहे, दोन्ही हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन ची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच त्यांनी मनपा व्दारा संचालित कोव्हिड टेस्टींग सेंटरची सुद्धा माहिती दिली.
कोव्हिड केअर सेंटरचे बाबतीत अतिरिक्त आयुक्त श्री.राम जोशी यांनी सांगितले की, आमदार निवास, पोलिस क्वॉर्टर पाचपावली, व्हीएनआयटी होस्टेल, सिम्बॉयसीस होस्टल आणि वनामतीमध्ये २८०० खाटांची व्यवस्था रुग्णांसाठी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ४७३० खाटांची व्यवस्था रुग्णांसाठी तयार करण्यात आली आहे. तसेच ३३५६ खाटांची व्यवस्था प्रस्तावित आहे. हॉटेल्समध्ये सुद्धा कोविड केअर सेंटरची परवानगी देण्यात आली आहे.
महापौर श्री.संदीप जोशी यांनी सांगितले की, प्रशासनाचे दावे आणि वर्तमान परिस्थीतीमध्ये मोठी तफावत दिसत आहे. याबददल सत्य परिस्थिती जाणण्यासाठी ही समिती गठीत करण्यात येत आहे. समिती सत्य परिस्थितीची पाहणी करुन आपला रिपोर्ट देतील.
खासगी रुग्णालयासाठी उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे यांच्या नेतृत्वात आरोग्य समिती सभापती श्री.वीरेन्द्र कुकरेजा, नगरसेवक श्री.संदीप सहारे, श्री.संजय बंगाले, श्री.दुनेश्वर पेठे व अति.आयुक्त श्री.संजय निपाणे यांच्या समितीची घोषणा केली. शासकीय रुग्णालयांसाठी श्री.दयाशंकर तिवारी यांचा नेतृत्वात श्री.सुनील अग्रवाल, श्री.प्रफुल गुडधे, श्रीमती वैशाली नारनवरे व डॉ.भावना सोनकुसळे तसेच कोव्हिड टेस्ट सेंटरसाठी श्रीमती वर्षा ठाकरे यांचा नेतृत्वात श्रीमती दिव्या धुरडे आणि संचालक, घनकचरा व्यवस्थापन व उपायुक्त डॉ.प्रदीप दासरवार तसेच कोव्हिड केअर सेंटरसाठी व हॉटेल याची पाहणी करण्यासीठी स्थायी समिती सभापती श्री.विजय झलके यांच्या नेतृत्वात सत्तापक्ष नेता श्री. संदीप जाधव, विरोधी पक्ष नेता श्री.तानाजी वनवे, श्री.किशोर कुमेरिया, संजय महाकाळकर, विधी व सामान्य प्रशासन समिती सभापती श्री.धर्मपाल मेश्राम व उपायुक्त श्री.निर्भय जैन यांची समितीची घोषणा केली असून ही समिती संबंधित संस्था/केंद्राची पाहणी करतील.
महापौरांनी सांगितले की, नागरिकांना दिलासा देण्यासाठी एन.जी.ओ.ची मदत कशी घेता येईल याबाबत प्रशासनाने आपले मत दयावे. कोरोना प्रादुर्भाव वाढत चालला आहे आणि या रुग्णांना वाचविण्यासाठी सगळयांनी समोर येण्याची गरज आहे. त्यांनी टेस्टींगची संख्या वाढविणे आणि आशा वर्कर्सना रु. १००० चा अतिरिक्त मानधन देण्याचे निर्देश दिले.
बैठकीत आमदार व माजी महापौर श्री.प्रवीण दटके, उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती श्री.विजय (पिंटु) झलके, सत्तापक्ष नेता श्री.संदीप जाधव, विरोधी पक्ष नेता श्री. तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक श्री.दयाशंकर तिवारी, आरोग्य समिती सभापती श्री.वीरेन्द्र कुकरेजा, विधी व सामान्य प्रशासन समिती सभापती श्री. धर्मपाल मेश्राम, नगरसेवक सर्वश्री प्रफुल गुडधे, किशोर कुमेरिया, संदीप सहारे, संजय महाकाळकर, सुनील अग्रवाल, संजय बंगाले, दुनेश्वर पेठे, अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा, श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेन्द्र सवाई उपस्थित होते.
News Credit To NMC