गृहमंत्री देशमुखांना पुन्हा धमकीचा फोन: बंगल्यावर वाढवली सुरक्षा
नागपूर: अभिनेत्री कंगना रनौतच्या प्रकरणाबाबत गृहमंत्री अनिल देशमुखांना सतत धमकीचे कॉल येत आहेत. रविवारी सकाळी पुन्हा त्यांच्या घरी धमकीचा फोन आला असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना या प्रकरणापासून दूर राहण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या फोन कॉलमुळे देशमुख यांच्या बंगल्यात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. देशमुख हे राज्याचे गृहमंत्री आहेत आणि नियमांनुसार त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाते.
प्रवासादरम्यान त्यांच्या ताफ्यातही झेड-प्लस सुरक्षा असते. सुरक्षेची २ मंडळे आहेत, पहिल्या घे-यात चेतावणी कार, पायलट कार आणि बुलेटप्रूफ कारचा समावेश आहे, तर दुसर्यात फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, टेल व्हॅन आणि स्थानिक पोलिसांची कार असते. आधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त विशेष संरक्षण युनिटचे सैनिक नेहमीच त्यांच्याबरोबर असतात.
त्याच्या घरी सशस्त्र पोलिस कर्मचा-यांची 2 पथकेही तैनात केली आहेत. कंगना रनौत यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि मुंबईची तुलना पीओकेशी केली होती. यावर देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली की ज्या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबई सुरक्षित नाही असे वाटते त्यांना येथे राहण्याचा हक्क नाही. यानंतरच देशमुख यांना धमकीचे कॉल येऊ लागले. रविवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी फोन आला. सोमवारी देशमुख यांनीही केंद्र सरकारने कंगनाला वाय प्लस सुरक्षा देण्यावर आक्षेप घेतला. यानंतर मंगळवार आणि बुधवारी धमकीचे कॉलही करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व फोन कॉल वेगवेगळ्या ठिकाणाहून केले जात आहेत.
बुधवारी सकाळी हा कॉल हिमाचल प्रदेशहून आला. पोलिसांना फोन करणा-यांची नावे सापडली आहेत. मृत्युंजय गर्ग असे एका व्यक्तीचे नाव आहे. त्यास लवकरच पकडले जाईल. मंगळवारी देशमुखांनी अभिनेता अध्ययन सुमनने केलेल्या आरोपांची मुंबई पोलिसही चौकशी करील असे वक्तव्य केले होते. अध्ययन अभिनेता शेखर सुमनचा मुलगा आहे. कंगना स्वतः ड्रग्स घेते असा आरोप त्याने केला होता.