पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची कुटुंबासारखी काळजी घ्या: वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत कुमार खराबे
नागपुर:- एमआयडीसी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत कुमार खराबे यांनी कर्मचाऱ्यांची कुटुंबासारखी काळजी घेण्यावर भर राबविण्यात येत असल्याची माहिती नुकतीच कळवीली आहे. कोरोनावायरस संसर्गात पोलिस कर्मचा-यांना सर्वात जास्त जनसंपर्कामुळे संभाव्य धोका असतो करिता अलीकडेच कर्मचाऱ्यांना औषधी व पल्स मीटरचे त्यांनी ठाण्यात केलं.
ते सातत्याने कर्मचार्यांच्या फिटनेस व प्रश्नांकडे लक्ष ठेवून आहेत त्यांनी ठाण्यातील प्रत्येक खोलीत कर्मचाऱ्यांसाठी वाफारा व सॅनिटाईजेशन यंत्रे ठेवली आहेत शिवाय प्रत्येक कर्मचाऱ्याला ते दर तासाला गरम पाणी पिण्यासाठी सांगतात, आता एकत्र जेवण करू नका, सामाजिक अंतर पाळा अशा प्रकारच्या सूचनाही त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटत असल्यास ताबडतोब ते त्यांना रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात. व फॉलो अपही घेतात, त्यांच्या नेतृत्वात एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्हे आलेख कमी झाला असून कर्मचाऱ्यांसाठीही ते वडिलकिच्या भूमिकेतून वागून असतात.
कोरोना कालावधीत आजपर्यंत पोलिस कर्मचार्यांनी आणि सर्व लोकांनी एकत्रित काम केले, प्रथम आम्ही लॉकडाऊन मधे राशन वितरण केले. आमचा भाग औद्योगिक असल्याने परप्रांतीय मजुर बहुसंख्येत येथे वास्तव्यास आहेत, त्यांसाठीची जेवण व्यवस्था ई.
राबविली, ज्यामुळे आमचे क्षेत्रातील लाखो कामगार त्यांच्या गावी परत गेले नाहीत, आता विद्यमान परिस्थितित कोरोनावायरस प्रादुर्भाव तिव्र आहे यामुळे आम्ही बाह्यभागातच पल्स ऑक्सिमिटर वगैरे सामग्री लावली आहे, ठाण्यात येणा-या प्रत्येकाचाच सॅनिटाईजेशन व पल्स ऑक्सीमीटरने ऑक्सिजनची पातळी तपासतो, ज्यांची कमी आढळली, शरिराचे तापमान जास्त आढळले तर त्यास हॉस्पिटलला पाठविण्यात मार्गदर्शन व मदत करतो आणि त्यासाठी, आम्ही सर्वांना निवारक औषधही दिले आहे, जे कर्मचारी पॉजिटिव्ह आहेत, त्यांच्या घरीच ऑक्सिमीटर, प्रतिबंधक औषधं पाठवले आणि ति घेण्याविषयक मार्गदर्शन केले जाते, नागपूरचे नवे आयुक्त अमितेश कुमार यांनी याविषयक कोणत्याही प्रकारची कमतरता कर्मचा-यास भासू नये असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार सर्व कार्यवाही चालू असल्याचे हेमंत कुमार खराबे यांनी सांगितले