नागपूर मध्ये उभारणार ॲग्रोटेक सेंटर: ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत
नागपूर: जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल पुणे-मुंबईच्या बाजारपेठेमध्ये ने-आणण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील उत्पादनांचा पुरवठा व त्याचे साखळीला अधिक चालना देणे, ग्रामीण कृषी उद्योगांना प्रोत्साहन देणे यासाठी अत्याधुनिक कृषी केंद्राची म्हणजेच ॲग्रोटेक सेंटरची उभारणी व ही नागपूर येथे करणार असल्याचे उर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी आज सांगितले. नागपूर मध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित ॲग्रोटेक सेंटर उभारण्यासंदर्भात डॉक्टर राऊत यांची मुंबईत टाटा टेक्नॉलॉजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, हे केंद्र उभारण्याच्या दृष्टीने नागपूर परिसराचा आणि राज्याच्या कृषी क्षेत्राचा बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे, हे केंद्र सार्वजनिक भागीदारी तत्वावर उभारले जाणार असून येथे कृषी व फळ प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे असे त्यांनी वार्ताहरांना सांगीतले. अशा प्रकारची शेतकरी केंद्रे त्यांच्या शेतमाल उत्पादन सर्वदूर पोचण्यात फार उपयोगी ठरतात. नागपुरात ही केंद्र निर्मिती होणे ही एक चांगली बाब ठरणार आहे