नागरिकांनी जबाबदारी करावा मास्कचा वापर: वाहतूक उपआयुक्त साळी
नागपूर: कोरोना महामारीचा रोगप्रसार रोखथामाकरिता व स्वत:चा यापासून बचाव करण्याकरता मास्क वापर करणे बंधनकारक केले गेले आहे, यासाठी नागपुरात महानगरपालिका चमूसह, वाहतूक पोलीस विभागही मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहे. उपायुक्त विक्रम साळी यांनी या संबंधित जनतेला आवाहन केले आहे, वाहतूक पोलीस विभागाने आतापर्यंत सहा हजार मास्क न वापरता वाहन चालवीत आढळलेल्या लोकांवर कारवाई करून दंड ठोठावला आहे.
पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी याबाबत माहिती देतांना नागरिकांना मास्कचा वापर जरूर करण्याचे आवाहन केले आहे, संपूर्ण पोलीस दल माननीय आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात नो मास्क वावरणा-यांर कारवाई करत आहे. विदाऊट मास्कचे आतापर्यत सहा हजार चलान केले गेले आहेत, कोवीड पासून दुर रहायचं तर मास्क, सॅनिटाईजर व सोशल डिस्टेंस हि त्रिसुत्री पाळावीच लागणार असल्याचे ते म्हणाले. मास्क पेहराव हा केलाच पाहिजे दुचाकी, चारचाकी वा पायी जरी फिरणार असाल तर मास्कशिवाय फिरत असल्यास दंडाचा सामना करावा लागेल.