कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या हातावर लावा स्टॅम्प: हायकोर्टाचा आदेश
नागपूर: कोरोना पॉझिटिव रुग्णांनी विलगीकरणात राहून स्वत:वर उपचार करण्याचे अपेक्षित असतांना ब-्याच जागी असे पॉजिटिव्ह रूग्ण शहरात मोकळेपणाने फिरत असल्याचे आढळून आले आहे, खरे तर त्यांना घरातच राहून उपचार घेणे आवश्यक आहे तसे आरोग्य खात्याचे निर्देशही आहेत पण प्रत्यक्षात ते गंभिरतेने पाळले जात नसल्याची उदाहरणे वाढत आहेत त्यामुळे कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या हातावर स्टॅंप लावण्याची मागणी वाढू लागली होती आता उच्च न्यायालयानेही अशा प्रकारांची तपासणी करणास व निर्देश पालन न करणाऱ्यांना हातावर स्टॅंप लावण्यात यावेत व तपासणी करणा-्यांच्या बोटाला शाई लावण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्तांना बुधवार रोजी दिला. या संदर्भातील वाढत्या तक्रारी व शहरातील मृत्युदर याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने स्वतःहूनच तशी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे, त्यावर न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांचे खंडपीठासमोर सुनावणी झाली, न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी कोरोना रूग्ण शहरात फिरत असल्याने कोरोना प्रसार झपाट्याने होत असल्याचे निरीक्षण नोंदविले.
या रुग्णांना रुग्णालयात वा घरातच राहून उपचार घेणे आवश्यक आहे परंतु ते घराबाहेर खरेदी वा अन्य कारण्यासाठी, कार्यालयीन कामासाठी जात असतील तर त्यांची ओळख पटविणे आवश्यक आहे, ते अकारण घराबाहेर जात असतील तर त्यांना विलगीकरण केंद्रांत ठेवण्यात यावे असे मत नोंदविले आहे, तेव्हा अशा प्रकारे लक्षने नसणा-यांना स्टॅंप लावता येणार नाही असे महापालिका आयुक्तांनी नमूद केले. कोरोनाची लागण होणे हा सामाजिक कलंक मानला जात आहे, त्यामुळे अशा प्रकारे स्टॅंप लावल्यास त्याचा नकारात्मक परिणाम सदर रुग्णांवर होईल असे नमूद केले तेव्हा त्यावर न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी यांचा अभिप्राय मागितला.