मृत्युसंख्येत किंचीत घट, चाचण्याही घटल्या
नागपूर:- शहरात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कोरोना मृत्यूंची संख्या अचानक वाढली होती. परिस्थिती अशी होती की दररोज 50 हून अधिक रुग्ण मृत्यूमुखी पडत होते, परंतु ऑक्टोबरपासून या मृत्यूंची संख्या कमी होऊ लागली आहे. डॉक्टरांनूसार 15 ऑक्टोबर नंतर, पॉजिटिव्ह आणि मृत्यू या दोहोंची संख्या हळूहळू कमी होईल. दरम्यान, शनिवारी 22 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2596 रुग्णांनी आपला जीव गमावला. जिल्ह्यातील कोरोनाच्या चाचण्या पुन्हा एकदा कमी होऊ लागल्या आहेत. या महिन्यात अधिकाधिक चाचण्या केल्या पाहिजेत, जेणेकरुन रुग्ण आढळून येतील. पण प्रशासन सुस्त असलेले दिसत आहे.
एकूण 22 रुग्ण मरण पावले, ज्यात 4 ग्रामीण आणि 17 शहरी रुग्णांचा समावेश आहे. एक रुग्ण जिल्ह्याच्या बाहेरील आहे. शनिवारी 876 लोकांत या संसर्गाची पुष्टी झाली. यासह जिल्ह्यात आता संक्रमित रूग्णांची संख्या 80844 पर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण सक्रीय प्रकरण 11250 आहे. यापैकी बर्याच रूग्णांवर घरातच विलगीकरण करत उपचार सुरु आहेत.
ग्रामीण भागात तपासण्या वाढवण्याची गरज:
या महिन्यात अधिकाधिक चाचण्या करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून संक्रमित व्यक्तींस वेळेत शोधून त्यावर उपचार करता येईल. दरम्यान आणखी काही खासगी प्रयोगशाळांनाही आता तपासण्यांची मान्यता देण्यात आली आहे. या स्थितीत, चाचण्या अधिकाधीक व्हावयास हव्या, परंतु परिस्थिती याउलट असल्याचे दिसून येते. शनिवारी 24 तासात सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांसह फक्त 5452 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये 2064 एन्टीजेन चाचण्यांचा समावेश होता. मेयो आणि मेडिकलमध्ये चाचण्या कमी होती असल्याचे आढळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 469336 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात परीक्षनं वाढवण्याची गरज आहे. कारण शहरानंतर ग्रामीण भागातील हा प्रवाह वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कमी होत जाणा-या चाचण्यांमुळे पॉजिटिव दर देखील खाली येत आहे असे दिसतेय. शनिवारी, 1821 रूग्ण बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 66998 रूग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. सध्या, रिकवरी दर 82.87 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
आतापर्यंत शहरातील स्थिती
80844 एकूण संक्रमित.
66998 ठीक झाले
2596 चा मृत्यू
शनिवारी 876 पॉझिटिव्ह