कोरोना: मृत्युदर कमी, रिकवरी दर वाढला
नागपूर:- शहरातील जानकार डॉक्टरांच्या अंदाजानुसार कोरोना रूग्णांचे संख्येत कमी होत आहे. सोमवारी, हा आंकड़ा 36 तर मंगळवारी 23 जणांचा मृत्यू झाला. यातील 5 रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील होते. यासह जिल्ह्यात आतापर्यंत 2682 रुग्णांचा मृत्यू झालाय. मंगळवारी वाढलेल्या चाचण्यांमुळे पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे.
सोमवारी 746 पॉझिटिव्ह आढळले होते. तर मंगळवारी संक्रमित रूग्णांची संख्या 898 होती, कालचे पॉझिटिव्ह रूग्णांसह जिल्हानिहाय आजवर 83105 संख्या झाली आहे. त्यापैकी 70767 बरे झाले आहेत. मंगळवारी जिल्ह्यात 7785 लोकांची चाचणी करण्यात आली. सर्वाधिक एन्टीजेन चाचण्या 4556 होत्या. ग्रामीण भागात 337 आणि शहरातील 556 रुग्ण संक्रमित झाले आहेत. शहरात रूग्णवाढ कमी होत असतानाच ग्रामीण भागात ही संख्या वाढत असल्याचे दिसते.
मंगळवारी 1425 रुग्णांना बरे झाल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात सध्या 9656 सक्रिय प्रकरणे आहेत. जे मागील आठवड्यापेक्षा कमी आहे. घरात विलगीकरणात असलेल्यांची संख्या जास्त: जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 487049 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. डॉक्टरांचा अंदाज आहे की 15 ऑक्टोबरपर्यंत शहरातील रूग्णांची संख्या कमी होईल. ग्रामीण भागातील वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी आढळत आहे.
त्यांच्या तुलनेत, बरे झाल्यानंतर घरी जाणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळेच आता जिल्ह्यात रिकवरी दर 85.15 टक्के झाला आहे. खरं तर मृत्यूसंख्या आटोक्यात ठेवूनच अंदाज लावला जाऊ शकतो की साथीचा प्रादुर्भाव कमी होत आहे अथवा नाही. गृह विलगीकरणात उपचार घेणार्या रूग्णांची संख्या 5975 आहे. म्हणजेच आता रुग्णालयांमध्ये रूग्णांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारपर्यंत विविध रुग्णालयात एकूण 3681 रुग्ण दाखल होते.