सिंधीबांधव देतील राममंदिरासाठी झुलेलाल यांच्या चित्रीत २०० रजतविटा
नागपूर:- जगात प्रातिनिधीत्व असणारे विश्व सिंधी सेवा संगम आणि पुण्यातील संस्था सुहिना सिंधी यांच्या वतीने अयोध्येत उभारल्या जाणा-या राम मंदिरात आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजू मानवाणी यांच्या नेतृत्वात प्रत्येकी एक किलो वजनाच्यी 200 चांदीच्या विटा देणार आहेत जागतिक सिंधी सेवा संगमचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप मोटवानी म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेटीचा वेळ दिल्यानंतर दिवाळीच्या आसपास लवकरच या विटा अयोध्या किंवा लखनऊमध्ये त्यांच्याकडे सुपुर्द केल्या जातील.
सिंधी समाजातील वरुण देवतांचे पोर्ट्रेटही या २०० चांदीविटांवर रंगविले जाईल. या 200 चांदीच्या विटा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिंधी समाजचे इंदौरचे खासदार शंकर लालवाणी आणि यू.पी. मधील गोरखपूरचे खासदार रवी किशन यांच्या मार्गदर्शनात देण्यात येतील, अशी माहिती डॉ.राजू मानवाणी यांनी दिली. सुहिना सिंधी अध्यक्ष पीतांबर पीटर ढलवानी यांच्या म्हणण्यानुसार, या सद्गकार्यासाठी संपूर्ण जगातील सिंधी समाज मोठ्या उत्साहात सहकार्य करून या पुण्य कार्यात भाग घेत आहे.
संपूर्ण जग त्यात योगदान देत आहे. महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रताप मोटवानी म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक भाविकांचे यात सहकार्य मिळत आहे. नागपुरातील अॅड मीरा भंभवानी यांच्या संयोजनात २ चांदीच्या विटा दिल्या जात आहेत. हिंगणघाट येथूनही एक वीट पाठविण्यात येत आहे. वर्धा येथून भगवानदास आहुजा व जेसा मोटवानी वडसा यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. महाराष्ट्रात पूणे मुंबईसह इतर शहरांचा पाठिंबा मिळाला असून नागपूरच्या झुलेलाल मंदिराच्या कोडूमल धनराजनी यांनीही सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
दादा गोपाळदास सजनानी, डॉ. राजू मनवाणी, अनूप थारवाणी, भारती छाबरीया, पितांबर पीटर ढलवानी म्हणाले की, दिवाळीच्या सुमारास किलोग्राम वजनाच्या 200 चांदीच्या वीटा झुलेलाल भगवानांचे चित्राने रंगतील. महाराष्ट्र विश्व सिंधी सेवा संगम, देणगीदाराला एक आकर्षक आभार पत्र देईल आणि सिंधी सम्मेलनात मोठ्या देणगीदारांचे सत्कार केले जातील.