नवरात्रीत सोने लागले झळाळीला
नागपूर: नवरात्रोत्सवानिमित्त सोन्याच्या खरेदीला वेग आलेला आहे, दसरा दिवाळी आणि लग्नसराई लक्षात घेतला सराफात ग्राहकांची गर्दी झालेली आढळते आहे. याशिवाय दागिण्यांचे विनिमयात वाढ झालेली आहे, तयार व ऑर्डर देऊन बनवले जाणारे दागिने व्यवहार वाढले असल्याचे सराफा व्यवसाई सांगतात.
एकिकडे बाजारात सोन्याच्या दरांत मोठी वाढ झालेली आहे, बावन्न हजाराचे आसपास सोन्याचे दर पोहोचलेयत तरि ग्राहकीवर त्याचा विशेष परिणाम जाणवत नसल्याचे या उलाढालींतून उघड होतेय. सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढतीच आहे.
अनलॉकमधे लग्नसोहळ्यांना नियम शिथील केल्या गेल्याने परवानगी मिळू लागलीय व त्यामुळे वर व वधूपक्षांना लग्नासाठी खरेदीचे वेध लागलेत त्यामुळे बाजारातली रौनक परतल्याचे चित्र सर्वत्र आहे.
सोने एक्कावन हजाराचे वर तर चांदीचे दर प्रतिकिलो पासष्ठ हजारावर आहे, येत्या काळात दर चढतीवरच रहाण्याची संभावना सराफा व्यावसायिक व्यक्त करताहेत, ग्राहकांची पाउले उत्सवांनिमित्त का होईना दुकानांकडे वळू लागली आहेत यामुळे तब्बल आठ महिण्यांपश्चात सराफा बाजारात चैतन्य परतले आहे.