गांधीबाग थोक कापड मार्केट पाळणार आठवडाभराचा कर्फ्यु
नागपुर:- शहरातील कोवीड-19 ची वाढती प्रकरणं लक्षात घेता गांधीबाग येथील घाऊक कापड बाजार संघटनेने 13 सप्टेंबर पासून 20 सप्टेंबर पर्यंत, आठवडाभर गांधीबाग कापड बाजार बंद राखण्याचा आज निर्णय घेतला आहे.
शहरातील कोवीड-19 ची वाढती परिस्थिती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. घाऊक कापड बाजार संघटनेला शहराच्या विविध व्यवसायीकांकडून एक आठवडा बाजार बंद ठेवण्याच्या सूचना व पत्र मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तो संघटनेने आज प्रसिद्ध केला.
स्वयंस्फुर्तपणे यात सहभागी होण्यास विविध कापड विक्रेता व्यावसायिकांनी हमी दिली आहे याविषयीचा पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे. अन्य व्यवसाईकांनीही हा आदर्श बाळगत कोरोनावायरस संसर्ग लढ्यात आपलेही शक्य तितके योगदान द्यावे अशी मागणी होते आहे.