आम आदमी पार्टी कडून लखीमपूर खिरी येथिल हत्याकांडाचा निषेध व शहीद झालेल्या शेतकऱ्यांना कैंडल मार्च काढून श्रद्धांजली
केंद्र सरकारच्या तीन काळ्या कायद्याविरोधात मागील दहा महिन्यापासून दिल्ली येथील सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाचा समर्थनार्थ लखीमपूर खिरी येथे रविवारी सुरू असलेल्या निदर्शनाच्या वेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री ह्यांच्या मुलाने आपल्या कारने आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांच्या अंगावर कार चालवून शेतकऱ्यांची हत्या केली, शांततेने आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आन्दोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा हकनाक बळी गेला. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात आणखी चार शेतकऱ्यांचा शहीद व्हावे लागले. ह्या घटनेचे गंभीर, संतापाचे वातावरण निर्माण होऊन त्याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटले. ह्या घटनेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीतर्फे काल दिल्ली येथे तसेच शेतकरी संघटनांनी देशभर निदर्शने केलीत.
ह्याच घटनेच्या निषेधार्थ आज नागपूर येथे मुंजे चौकातुन कैंडल मार्च काढून गांधी पुतळा, व्हेरायटी चौक येथे आम आदमी पक्ष, नागपूर तर्फे जुलमीं तानाशाह सरकार विरोधात निषेध व्यक्त करून शहिद शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच पक्ष कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मूक निदर्शने केलित.