व्यसनमुक्त होळी
संवाद बहुउद्देशीय शिक्षण संस्था, नागपुर ही नोंदणीकृत संस्था मागील ०५ वर्षा पासून व्यसनमुक्ती सल्ला उपचार व पुनर्वसन तसेच अन्य सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून ही संस्था नागपुर शहर आणी विदर्भ स्तरावर शाळा, महाविद्यालय, तसेच शहरात विविध भागामध्ये विविध पद्धतीने जसे पथनाट्य , संपुदेशन, शिबिर, मार्गदर्शन, पुनर्वसन, करून समाजामध्ये जनजागृती करीत आहे व त्याचा हजारो लोकांना फायदा होत आहे .
त्याचप्रमाणे या वर्षी होळी या सणा निमीत्त संवाद बहुउद्देशीय शिक्षण संस्था, नागपुर कार्यकारणी मंडळाने व्यसनाधीन लोकांसाठी जनजागृती व्हावी या दृष्टीेकोनातून उद्देश्याने होळी मध्ये तंबाखू , गुटखा, खऱ्या, पान-पुडी , दारू बॉटल, व अन्य नशा आम्ली पदार्थ चे ज्वलन करून व्यसना विरोधी संस्था द्वारा समजा मध्ये जनजागृती करण्यात आली.
त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विनोद गजघाटे सर, डॉ.निलेश गुल्हाने सर, उपस्थित होते. डॉ.गजघाटे यांनी आपल्या भाषणा मधून युवांना नशे पासन दूर राहण्यास मौलिक मार्गदर्शन केले व व्यसन ही समजला लागलेली किड आहे असे सांगीतले डॉ.गुल्हाने यांनी व्यसनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम या बाबिशी उपस्थितांना अवगत केले. त्यावेळी संवाद बहुउद्देशीय शिक्षण संस्था चे अध्यक्ष – मिलींद पाटिल , सचिव – निलेश पाटील, उपाध्यक्ष – राजेश वाघमारे ,कोषाध्येक्ष – सुनंदा टिकले , सहसचिव – जगदीश कांबळे, अतूल सुखदेवे, अभिलाष बोरकर, हर्षल सातपुते, नीरज धाबर्डे , निखिलेश गौरखेडे , दिपाली वाघमारे व अन्य उपस्थित होते..