InformativeNagpur Local
अभ्यासिका तात्काळ सुरु करा अंकुर फाऊंडेशनची मागणी,अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र खजानी यांना दिले निवेदन
कोरोना वायरस या महामारीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. आता हळू हळू सरकार त्यामध्ये शिथीलता आणतांना दिसत आहे. परंतु रखडलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा, राज्यसेवेच्या आणि केंद्राच्या परीक्षा लवकरच घेण्याचे नियोजन राज्य सरकार करते आहे. पण विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अजून पर्यत अभ्यासिका सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यास करण्याकरिता व्यवस्था सुद्धा नसल्याने त्यांच्या समोर अडचणीत वाढ होत आहे. या संपूर्ण परिस्तिथीचे गांभीर्य लक्षता घेऊन राज्य सरकारने तात्काळ शासकीय व खाजगी अभ्यासिका सोशल डिस्टनसिंग, मास्क आणि सॅनेटायजरचे या नियम व अटीचे पालन करून विद्यार्थ्या समोरची अडचण दूर करून अभ्यासिका लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी अंकुर फाऊंडेशनच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र खजानजी यांच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यत गिरीश कुबडे, शुभम महारतळे, प्रवीण कुरस्कर, रक्षित सावला, अमोल पोहाणे व तुषार धारकर यांनी यावेळी निवेदनातून मागणी केली.