2 महिन्यानंतरची नागपूरात सुरू प्रवासी विमानवाहतूक प्रथम दिवशी आले 4 विमान, 375 प्रवाश्यांचे आगमन तर 221 बाहेर गेले
नागपूर:- अंदाजे 2 महिन्यानंतर पुन्हा एकदा नागपूर विमानतळावर हालचाली घडल्या. पहिल्याच दिवशी 4 विमान आले आणि परत रवाना झाले. यात दिल्लीचे 2, मुंबईहून 1 आणि बंगलुरूहून 1 असे विमान होते. 2 महिने आधी आणि आजच्या विमातळाचे चित्र बरेच निराळे होते. प्रवासी, एअरपोर्ट कर्मचारी, एअरलायन्स आणि सुरक्षा कर्मचारी सर्वच मास्कमध्ये दिसत होते. आधीचे तुलनेत सुरक्षिततेवर जास्त भर होता.
थर्मल स्क्रीनिंग नंतरच प्रवाशांना विमानतळ परिसरात प्रवेश दिल्या गेला. सकाळी 6 वा. सुरू घडामोडी दुपारपर्यंत संपल्या. चारही विमाने दुपारी 1:15 वा. येथून रवानाही झाली. रात्रौ 8 वाजता कोलकाता जाणारे विमान रद्द केले गेले. सुरूवातीस 7 विमानांस मान्यता दिल्या गेली होती, पश्चात पुणे आणि मुंबईचे 1-1 विमान रद्द केले गेले. यामुळे ईतर प्रवाशांना त्रास सोसावा लागला.
9.45 वाजता पहिले उड्डाण: सोमवारी येथे येणारे 4 विमानांत प्रथम दिल्ली येथून एअर इंडिया चे विमान आले व सकाळी 9.45 वाजता दिल्लीला रवाना झाले. 9.45 वाजता बंगळुरूहून दुसरे विमान आले जे 11 वाजता बंगलुरूस परत रवाना झाले. मुंबईहून 10.55 वाजता आलेले विमान 12 वाजता परतले, 11.45 वा. दिल्लीहून आलेले विमान दुपारी 1.15 वा रवाना झाले. चारही विमानांतून 375 प्रवासी आले, तर येथील 221 प्रवासी रवाना झाले. दिल्लीहून सुमारे 50-60 प्रवासी आले आणि तेवढेच येथून गेले. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनूसार तिचे पालन केले जात बाहेरून येण्या-या सर्व प्रवाश्यांना होम क्वॉरंटाईन केले जात आहे.