लाॅकडाऊन दरम्यानच्या ३ महिन्याचे विजेचे बिल माफ करावे या मागणीसाठी आंदोलन
नागपुर:- वंचित बहुजन आघाडी तर्फे आज १ जुलै २०२० ला संविधान चौक, नागपुर येथे पक्षाचे नागपुर शहर अध्यक्ष रवीभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात लाॅकडाऊन दरम्यानच्या ३ महिन्याचे विजेचे बिल माफ करावे या मागणीसाठी आंदोलन करन्यात आले व नागपुर चे मा. जिल्हाधिकारी तसेच मा. पालकमंत्री तथा राज्याचे उर्जामंत्री नितिन राऊत यांना निवेदन देन्यात आले.
लाॅकडाऊन मधे सर्वच गरिब जनता घरी होती, व सर्वच कामधंदे बंद होते, त्यामुळे उत्पन्नाचे सर्व साधन बंद होते. अशामधे सामाजिक संस्थांनी केलेल्या राशन अथवा इतर जिवनावश्यक वस्तूंच्या मोफत वाटपामुळे सामान्य जनतेला उदरनिर्वाह करने सोपे झाले. अशा परिस्थिति मधे जेव्हा दोन वेळचे जेवन मिळने मुश्किल होते, तेव्हा विजेचे बिल भरना करने कसे शक्य होईल.
आजही लाॅकडाऊन काहिसा शिथिल केल्यानंतर पाहिजे त्या प्रमाणात कामधंदे नसल्यामुळे सामान्य जनता कोंडीत सापडलेली आहे. व अशातच महावितरन तर्फे मागिल तिन महिन्याचे अवाढव्य बिल पाठवन्यात आले आहे. व ते बिलही मिटर रिडींग नुसार नसून कुठेही ताळमेळ न बसनारे आहे. त्यामुळे सामान्य जनतेसमोर खुप मोठा पेच निर्माण झालेला आहे.
वंचित बहुजन आघाडी ची मागणी आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्वच गरीब, देहाडी मजदूर, बिपीएल, एपीएल व राशनकार्ड धारक, तसेच रिक्षाचालक, आॅटोचालक, हमाल, इं हातावर पोट असलेल्या जनतेचे विजेचे बिल सरसकट माफ करावे. इतर मध्यम वर्ग जो बऱ्यापैकी आहे त्यांना किमान ३०० युनिट विज माफ करावे.
सध्याचे मुख्यमंत्री व त्यांचा पक्ष शिवसेना यांनी निवडनुक जाहिरनाम्यात ३०० युनिट विज मोफत देन्याचे वचन दिले होते, त्यांनी त्यांच्या वचनाची पुर्तता करावी. ही वंचित बहुजन आघाडी ची मागणी आहे. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उग्र आंदोलन करन्यात येईल असा इशारा पक्षातर्फे देन्यात आला.
या प्रसंगी पक्षाचे नागपुर शहर अध्यक्ष रवीभाऊ शेंडे, पक्षाचे वरिष्ठ नेते इंजि. राहुल वानखेडे, प्रा. रमेश पिसे, मंगलमूर्ती सोनकुसरे, नालंदा गणवीर, मायाताई शेंडे, हरीश नारनवरे, आनंद चवरे, मिलीद मेश्राम, अतुल शेंडे, चंद्रकांत दहिवले, हरीश नारनवरे, नंदिनी सोनी, कांचन देवगड, रमेश कांबळे, शिशुपाल देशभ्रतार, सिध्दांत पाटील, सुनील इंगळे अंकुश मोहिले, सुमेधू गेडाम, अविराज थुल, धर्मपाल लामसोंगे, अजय सहारे, धम्मदिप लोखंडे, निशांत पाटील, भारत लांडगे व पक्षाचे इतर पदाधिकारी, महिला आघाडी, युवा आघाडीचे असंख्य कार्यकर्ते व सोबतच मोठ्या प्रमाणात जनता उपस्थित होती.