अजनी पूल बांधकाम होऊनही उद्घाटनासाठीच बंद, तो तातडीने सुरू करा: करणी सेना
नागपूर:- अजनी पूल बांधकाम होऊनही उद्घाटनासाठीच बंद ठेवलेला आहे, तो तातडीने सुरु करावा व नागरिकांची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी करणी सेना कार्यकर्तानी आज केली. करणी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसहित पूलाच्या कामांचा आढावा घेतला, त्यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
करनी सेना जिल्हा प्रमुख पंजू तोतवानी यांनी सांगितले की आज आम्ही सर्व मिळून या मार्गाचे अवलोकन केले, फोनवर काहि अधिकारी काम पुर्ण झाल्याचे सांगतात तर काही अधिकारी ते थोडे बाकी असल्याचे सांगतात यामुळे निश्चित परिस्थिति काय हे जाणून घेण्यास्तव आम्ही आजचा हा दौरा केला यात काम पुर्ण असल्याचे आढळते.
वर्दळीची आजची समस्या लक्षात घेता नागरिकांची गैरसोय टळावी या हेतूने हा पूल तातडीने सुरू व्हायला हवा, अनेक नागरिक यासंबंधी तक्रारी घेऊन करनी सेनेकडे येत आहेत, क्रिया दस-याचे दिवशी आम्ही पूलावर गाड्या चालवून याचे उद्घाटन करू असा मनोदय आहे. केंद्रात एक, राज्यात एक व पालिकेत अन्य सत्ता असल्याने जनहिताची कामेही कशी उशीरा पर्यंत प्रलंबीत राखली जातात हे या उदाहरणातून पहावयास मिळते, राजकारणात सामान्यांचे काम अडते, करनी सेना हे हिंदू संगठन यापुढे जनतेच्या पाठी असणार आहे, अन्य हिंदू संगठन हिंदू पासून दुरावत आहेत, करणी सेनेचे काम पाहून यात जोड़ले जात आहेत. येत्या सहामाहीत ५० हजार नागरिक संगठनात जोडले जातील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.