डॉक्टरचे उपस्थितीशिवाय अँबुलंस पाठवू नये: मनसेवतीने निवेदन
नागपुर:- मनसे नागपुरवतीने नुकतेच मेयो ईस्पितळाचे सिव्हील सर्जन यांना डॉक्टरविना अँबुलंस न पाठविण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. याबाबत जर नवे आदेश शासनातर्फे निर्गमित करण्यात आले असतील तर त्यांचे प्रती पुरविण्यात याव्यात हि विनंतीही केल्या गेली आहे.
अंबूलस मध्ये डॉक्टर नसणे हि अवस्था म्हणजेच वाहन चालकाचाही जिव धोक्यात असण्यासारखी स्थिती आहे, दरम्यान प्रवास काळात प्रसूती, हार्ट अटॅक, रूग्णाची बेशुद्धावस्था अशा अडचणी निवारणाची जवाबदारी डॉक्टर नसल्याने कुणावर? अशा अडचणी लक्षात घेऊनच शासनाने ॲम्बुलन्स मध्ये डॉक्टरची उपस्थिति बाब घातलेली आहे पण याचे अजिबात पालन होताना दिसत नाहीय व परिणामी रूग्ण गतप्राण होत असल्याच्या घटना वारंवार घडतांना आढळताहेत, नातेवाईक व वाहनचालकात मारामारी चे प्रकार संभवतात, वाहनात डॉक्टर हजर असल्यास अशा घटनांची शक्यता कमी केल्या जाऊ शकतात, करिता यावर त्वरित अंमलबजावनी व्हावी असे मनसे वतीने या निवेदनात लिहिलेले आहे. निवेदनाची सहप्रत मुख्यमंत्री, आरोग्य संचालक, आरोग्य मंत्री व जिल्हाधिका-यांसही पाठवल्या जात असल्याचे निवेदनकर्ते उत्तर नागपुर मनसे प्रभाग अध्यक्ष संदिप चवरे यांनी कळविले आहे.