नागपूरच्या रस्त्यावर पुन्हा 40 इलेक्ट्रिक बसेस धावतील
नागपूर:- शहरांतील रस्त्यावर इलेक्ट्रिक बसेस धावण्यास सज्ज आहेत. मनपाच्या परिवहन समितीने 40 नवीन इलेक्ट्रिक बसेस परिवहन सेवेमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. मनपाच्या स्थायी समिती सभागृहात समिती अध्यक्ष नरेंद्र बोरकर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
मनपाच्या परिवहन सेवेत दाखल होणा-या 40 बसेससाठी निविदा मागविण्यात आल्या. निविदा प्रक्रियेत ई व्ही ई वाय ट्रान्सपोर्ट प्रा. लि. ला दर किलोमीटर मागे 72 रुपये 99 पैसे दर निश्चित करण्यात आला. पालिका आयुक्तांनी कंपनीप्रमुखांशी चर्चा केली आणि दर किलोमीटरमागे 66 रुपये 33 पैसे दर निश्चित केला.
प्रत्येक बससाठी केंद्र सरकारकडून 45 लाख रुपये देण्यात येणार आहेत. मनपाचा किलोमीटरचा दर फक्त 66 रुपये 33 पैसे भरावा लागणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. बस चालविताना नेमलेल्या कर्मचार्यांना पगार देण्याच्या सूचना परिवहन समिती सभापतींनी दिल्या. हा करार लवकरात लवकर करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
बैठकीत दिलेल्या मंजुरीनुसार कंत्राट लवकरात लवकर केले जाईल. मनपाच्या वाहतुकीच्या ताफ्यात 40 इलेक्ट्रिक बसेस सामील झाल्या तर परिवहन यंत्रणेला गती मिळेल, असे बोरकर म्हणाले. नागरिकांच्या सोयीसाठी आणि पर्यावरणीय संतुलनातही बराच हातभार लावेल.