अत्यावश्यक कामाखेरीज म.न.पा. मध्ये येण्याचे टाळावे
नागपूरात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याचा शिरकाव आता महानगरपालिकेच्या मुख्यालय व झोन कार्यालय पर्यंत झालेला आहे. अधिकारी व कर्मचारी मध्ये सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.
महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय व झोनमध्ये दररोज विविध कामासाठी मोठया प्रमाणात नागरिक येत असतात. विविध भागातील नागरिकांच्या येण्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म.न.पा.चे स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, अग्निशामण इ.विभागाव्दारा नागरिकांना अत्यावश्यक सेवा दिला जातात. सदर सेवा काही प्रमाणात बाधीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बाधीत होवू नये यासाठी सर्व संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्या सुरक्षेचे दृष्टीने सदर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.
उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता म.न.पा. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महानगरपालिकेच्या मुख्यालय तसेच झोन कार्यालयामध्ये नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय येण्याचे टाळावे असे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांना मनपाच्या कोणत्याही अत्यावश्यक कामाविषयी तक्रार असल्यास ते मनपाचे “नागपूर लाईव्ह सिटी “ मोबाईल ॲप वर तक्रार नोंदवू शकतात.
या ॲपव्दारे नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याबाबत मनपा प्रयत्नशील असून त्यासाठी नागरिकांना मनपा मध्ये येण्याची कोणतीही आवश्यकता राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना कोव्हिड-१९ संबंधी तक्रार असल्यास म.न.पा. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्र. ०७१२-२५६७०२१, २५५१८६६ तसेच पाणी पुरवठा व चोकेज संबंधी तक्रारी असल्यास ०७१२-२५६५५०९ वर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात येत आहे.
News Credit To NMC