उत्सवां दरम्यान बंदोबस्त: गृहमंत्री
नागपूर:- गृहमंत्री अनिल देशमुख सांगतात, आगामी बकरी ईद, गणेशोत्सव आदी उत्सवांवेळी राज्य सरकारने बजावलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक बंदोबस्त राखावा. विभागीय आयुक्त कार्यालयात कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. ते म्हणाले की कोरोना आपत्तीकाळासाठी सरकारने घरीच सणांचे आयोजनासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी.
या बैठकीला पालकमंत्री नितीन राऊत, खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रकाश गजभिये, विकास ठाकरे, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त मुंडे, विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलिस सहआयुक्त नीलेश भरणे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मेडिकलचे डीन डॉ. सजल मित्र, मेयोचे डीन, डॉ अजय केवलिया, डॉ व्ही.डी. पातूरकर, डॉ.अविनाश गावंडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले की, राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोना केसेसची संख्या कमी आहे, तरीही आता ही संख्या वाढली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लॉकडाऊनचे पालन नागरिकांनी गंभीरतेने केले नाही. प्रशासन व पोलिस विभागाने हे नियम पाळले जाण्यास्तव कठोर पावले उचलायला हवी.
समन्वयाने काम: पालकमंत्री राऊत म्हणाले की, सर्व विभागांचे अधिकारी यांनी एकमेकांशी आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने कार्य केले पाहिजे, जेणेकरुन नागरिकांस होणा-या अडचणी टाळता येतील. लोकांचा आत्मविश्वासही वाढेल. ते म्हणाले की कोरोना वेगाने वाढू लागला आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांद्वारे नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. ते म्हणाले की, प्रतिबंधित क्षेत्राचे भाग लहान आणि मर्यादित ठेवले पाहिजे जेणेकरून नागरिकांना त्रास होऊ नये. कोरोना ग्रामीण भागातही पसरला आहे. हे रोखण्यासाठीच्या प्रयत्नांत शेतकर्यांना कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे. खासदार तुमाने यांनीही काही सूचना केल्या. बैठकीत नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईची माहितीही अधिका-यांनी दिली.