राज्यसेवा परिक्षेच्या उमेदवारासाठी एपीआयई तर्फे मोफत देण्यात आली ऑटोरिक्षा सेवा
असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह इम्पॉलाईज ऑफ इंडीया (एपीआयई ) तर्फे रविवारी पार पडलेल्या राज्यसेवा पूर्व परिक्षा देणाऱ्या उमेदवारांना बसस्थानक ते परिक्षा केंद्र येजा करण्यासाठी मोफत ऑटो रिक्षा सेवा पुरविण्यात आली.
खेडेगावातून उमेदवार ही परिक्षा देण्यासाठी शहराच्या ठिकाणी येतात त्यांना बसस्थानक ते परीक्षा केंद्रावर लॉकडाऊनच्या काळात पोहोचण्यासाठी अडचणी येऊ नये म्ह्णून असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज इंडिया या संघटनेतर्फे यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर येथे ऑटोरिक्षा , कार व मोटारसायकल च्या मदतीने कार्यकर्त्यांनी बसस्थानक ते परीक्षा केंद्र तसेच परिक्षा केंद्र ते बसस्थानक अशी मोफत सेवा देऊन मदत केली, त्यामुळे उमेदवारांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास मदत झाली. एपीआयईच्या सदस्यांनी स्वतःच्या कार आणि दुचाकीवरही काही परिक्षार्थिंना नागपुरातील केद्रावर वेळेत पोहचवले .चंद्रपूर शहरातही नेहरू शाळा , मातोश्री विद्यालय इत्यादी केंद्रात उमेदवारांना पोहचवण्यात आले . सदर सेवेचा लाभ जवळपास 50 ते 60 विद्यार्थ्यांना घेतला.