+92 ने सुरू होणाऱ्या क्रमांकाचे व्हाट्सअँप कॉल टाळा, लुटारू शोधताहेत सावज
भारतात ऑनलाईन खरेदी आता अगदी सर्वसामान्य गोष्ट झाली आहे, फ्लिपकार्टवर बिग बिलीयन डे आणि ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेल वर भारतीयांच्या उड्यांनी त्यांचे सर्वर ठप्प झाल्याचे प्रताप आपणा भारतीयांच्याच नावावर आहेत, परिणामी आता कुटुंबात सर्वांकडेच स्मार्टफोन उपलब्ध आहेत व प्रत्येक स्मार्ट फोनवर बॅंक कार्ड डिटेल व चॅटसाठी व्हाट्सअप हे अँपही आहेच.
व्हाट्सअप वर नेट कॉलिंग सुविधा हे उपयुक्त फिचर आलेलं आहे पण हेच फिचर सद्ध्या सर्वांसाठी डोकेदुखी बनत आहे कारण +92 क्रमांकावरून सुरू होणाऱ्या फोन नंबर वरून फोन येणे सुरू झालेले आहेत व हा क्रमांक पाकिस्तानचा कोड आहे.
पाकिस्तानी हॅकर्स आकर्षक डिस्काउंट व अन्य भुलावण्या देत आपले अकौंट रिकामे करण्याच्या सतत प्रयत्नात असतात, गेले ४ महिने असे कॉल आल्याचे रिपोर्ट देशभरात सर्वच ठिकाणी नोंदले गेलेयत. आपणास +92 पासून सुरू होणार्या नंबरवरुन कॉल आला तर तो कोणत्याही परिस्थितीत टाळा, गृह मंत्रालयाने भारतीय नागरिकांना सायबर सुरक्षेसाठी असे आवाहन काहि महिनेआधीच केले आहे.
हे कॉल, ऑनलाईन फसवणूक करणार्यांकडून येऊ शकतात, जे आपले पैसे हडपू शकतात आणि कोणताही पुरावा मागे न ठेवता गडप होऊ शकतात. मोबाइलचा ताबा घेऊन बॅंक अकौंट डिटेल चोरने अथवा सिम क्लोनिंग करून दुरूपयोग हाच त्यांचा उद्देश्य असतो.
हे नंबर आपणाला लोकप्रिय नावाने सेव्ह दाखवतील, जसे: केबिसी इ. पण या फसवणूकीस आपण कदापी बळी पडू नये, याचा वापर संवेदनशील माहिती मागण्यासाठीही केला जाऊ शकतो, हे नंबर वापरणारे कॉलर्स आपले बँक तपशिल हडण्यासाठी आवश्यक ओटीपी किंवा बँक लॉगिन तपशिल यासारखे गोपनीय डेटा मिळवू पहातात.
तुम्हास भुलवण्यासाठी ते भिन्न तंत्र वापरतात, ते एखाद्या बँकेचे प्रतिनिधी, एखाद्या कंपनीच्या अधिकारी म्हणून विनामूल्य सहल वा भेटवस्तू देण्यास्तव तपशील मागतात एकदा आपण तो दिल्यास, मग काहीच करता येत नाही, आपला तपशील सामायिक केला तर मागे फिरता येत नाही. ते थेट दुसर्या (बनावट) खात्यात पैसे हस्तांतरन वा ऑनलाइन खरेदी करून आपले खाते साफ करू शकतात. नंतर कोणत्याही परिस्थितीत, पैसे परत मिळविणे जवळजवळ अशक्य आहे.
आपल्या व्हाट्सअपवरही असा कॉल आल्यास घाबरण्याची गोष्ट नाही पण असं झाल्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी करायच्या त्या अशा:
√ तो कॉल कदापि रिसीव्ह करू नये
√ पुर्ण रिंग वाजू देऊन बंद होऊ द्या अथवा कॉल कट करावा
√आपण चुकून उत्तर दिल्यास लक्षात ठेवा की आपल्याला आपले क्रेडेन्शियल्स, लॉग इन केलेला तपशील आणि कॉलवर ओटीपी कधीही सामायिक करायचा नाही.
√ काही उत्सुक असा कॉल एक्सेप्ट करतात, या नंबर वर कदापि कॉलबॅक करू नये अथवा मेसेज चॅट करून “तु कोन?” हे विचारू नये.
कारण एकदा का आपण चॅट सुरू केली की ते काहि ना काही बहाण्याने आपणास भुलवतील
√ यावर रिप्लाय ने आपणांस लिंक पाठवली जाते अथवा फोटो असतो जो क्लिक करणे घातक ठरते
√ उत्तम आहे की त्या नंबरला तुम्ही व्हाट्सअप वरून ब्लॉक करावे
√ ब्लॉक केल्यानंतर त्या नंबरच्या वापरकर्त्याकडून पुन्हा तुम्हाला मेसेज व कॉल येण्याची शक्यता संपते
√ याखेरीज ब्लॉक केल्यानंतर त्या क्रमांकाला रिपोर्ट करण्याची सुविधाही व्हाट्सअप मध्ये उपलब्ध आहे त्या सुविधेचाही वापर करावा जेणेकरून व्हाट्सअप त्या नंबर विषयी चौकशी करत त्याद्वारे मिसयुज होत असेल तर त्याला कायमचा रद्द/ ब्लॉक करू शकतो
या माध्यमाने हॅकर्स स्पॅमर्स फ्रॉडस्टर व्हॉट्सअॅप च्या एन्क्रिप्टेड कॉल सुविधेचा फायदा घेत सरकारी सुरक्षेपासून वाचू बघतात त्यामुळे असे कॉल फक्त रिपोर्ट नव्हे तर कंपनीस मेल करूनही कळवावे ज्यायोगे त्यांवर कारवाई होऊन ईतरांचीही लुबाडणूक थांबेल.
वेब आणि ईमेलनेही घोटाळे शक्य: कॉलसह, फसवणूक करणारे आपली फसवणूक करण्यासाठी वेब, ईमेल देखील वापरू शकतात. बनावट वेबसाइट्सद्वारे किंवा ईमेलद्वारे आपले क्रेडेन्शियल, आपली माहिती/ पैसे स्वेच्छेने देण्याच्या उद्देशाने – जसे कॉलच्या बाबतीत तसेच.
असे हल्ले टाळण्यासाठी विश्वासू साइटवरच व्यवहार करावेत. लक्षात घ्या आपली सुरक्षा आपल्याच हाती.