‘बाबा का ढाबा” तर चमकला आता लक्ष द्या नागपूरच्या ‘डोसा आजी’कडे व तिच्या सह्रदयतेकडे
नागपूर: सोशल मीडिया ची ताकत काय असते ते गेल्या ४ दिवसापासून सर्व लोक विविध चॅनेलवर दिल्लीतल्या “बाबा का ढाबा” या स्टॉल चालवणाऱ्या वृद्धाच्या पालटलेल्या परिस्थितीतून पाहत आहेतच, यापूर्वीही गायिका राणू मंडल सोबत असा प्रसंग घडलेला आपण अनुभवलाय व सर्वसामान्य जनतेची साथ व सदिच्छा कशा कायापलट करतात याचे उदाहरणच सर्वांनाच दिसले असेल.
आपल्या नागपुरातही बरीचशी अशी स्थळे आहेत ज्यांत असे कैक ढाबेवाले बाबा आपल्या सदिच्छांची, मदतीची वाट पाहत आहेत. आज आम्ही आपणाला “डोसा आजी” विषयी सकाळी माहिती दिली होती, तिच्याचविषयीची सखोल माहिती अशी:
₹१० ला ४ डोसे विकणा-या 61 वर्षांच्या शारदा चोरघडे यांना “डोसा आजी” संबोधतात. सात वर्षापूर्वी गरीबी आणि उपासमारीस कंटाळून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय सुरू केला होता.
शारदा आजी तिच्या डोसा स्टॉलद्वारे कामगार आणि शाळकरी मुलांना ताजे आणि गरम डोसे खाऊ घालते आहे. जेव्हा केव्हा डोसा आजी कोणत्याही अडचणीत येते तेव्हा ती स्वत:ला सर्व काही ठीक होईल असे सांगून धीर देते.
लग्नानंतर तिने पतीचे अत्याचार सहन केले, आईचे निधनानंतर एकटेपण सोसले, अनेक दिवस उपाशी राहून काढले तरी तिची विचारसरणी सकारात्मक राहिली. सात वर्षापूर्वी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी डोसा विक्री सुरू केली. तेव्हा ती ₹२ मधे डोसा विकत असे.
जेव्हा लोकांनी तिला कमी किंमतीत डोसा विकण्याचे कारण विचारले तेव्हा ती हसू लागायची. म्हणायची मी इतकं दारिद्र्य पाहिलय मी आणि माझा मुलगा दोघेही भुकेले झोपलो. मला माहित आहे भूक म्हणजे काय. जेव्हा आपल्याला भुकेले राहावे लागते तेव्हा मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतो.
ती स्वतःचे बळावर स्वतःचे घर चालवते. परंतु तरीही त्यांना वाटते की ते इतरांपेक्षा चांगले मिळवतात. म्हणून इतरांना मदत म्हणून कमी पैशात डोसा खायला घालने आवडते. अशी सह्रदयता असणा-्या या आजीस मदत करत पर्यायाने गरिब मजूर व शाळकरींना सहाय्य करूया व आपल्यातील माणुसकिचाही परिचय देऊया.