बरसला मुसळधार: ठिकठिकानी रस्त्यावर साचले पाणी
नागपूर:- गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज पाऊस पडतो आहे, ज्यामुळे असे वाटतेय की उन्हाळ्यातच पावसाळा सुरू झाला आहे. मान्सून येणार आहे, पण त्यापूर्वी पावसाळ्याप्रमाणेच ढगांतून वर्षाव होतो आहे. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शहरात जोरदार वा-यांसह मुसळधार पाऊस सुरू झाला जो तब्बल दोन ते अडीच तास सुरू होता. त्यामुळे बर्याच ठिकानी, रस्ते आणि चौकांवर पाणी साचले.
या पावसाने गटारे आणि नाल्या तुंबल्या, प्रशासनाची सफाई बाब उघड्यावर आणली. विजवितरण विभागासही ठिकठिकाणी प्रवाह सुरळीत करण्यास बरीच धावपळ करावी लागली. पावसामुळे तापमानात घट झाल्याने उष्णतेपासूनही सुटका झाली. शनिवारी शहराचे कमाल तपमान 35.3 अंश नोंदविले गेले जे सरासरीपेक्षा 6.3 अंश कमी होते, तर किमान तापमान 22.8 अंश, जे सरासरीपेक्षा 5.5 डिग्री खाली आहे.
शुक्रवारी उशिरा रात्रीही शहरात जोरदार पाऊस पडला. शुक्रवारी रात्री 11.15 वाजेच्या सुमारास रिमझिम सुरू झाली आणि त्यानंतर मुसळधार पाऊस पडला. जोरदार वा-यांसह पावसाने थंडी वाढविली होती, त्यामुळे लोकांना घरांचे कूलर बंद करावे लागले. शुक्रवारी रात्री ते शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत हवामान विभागाने 10.4 मिमी पावसाची नोंद केली.
हवामान खात्याने शहराती हवामानाचा अंदाज 12 जून पर्यंत तत्सम रहाण्याची शक्यता वर्तवीली, येत्या चोवीस तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणांसह शहरामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 ते 10 जून दरम्यान दिवसा जोरदार वारे वाहतील. 11 आणि 12 जून रोजी अंशतः ढगाळ वातावरण असेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडेल.