सावधान, खेळाखेळात दृष्टि गमावू नका
नागपूर:- दिवाळी म्हटलं की मुलांची फटाके आणि ते फोडण्यास येणारे नवनवीन साहित्य हे समीकरण ठरलेलेच. चीन मधून विविध प्रकारच्या बंदुका व अन्य उपकरणों दरवर्षी बाजारात यायचे, पण या वेळी चीन निर्मित सामानावर बंदी असल्याकारणाने देशी उत्पादनां वरच भर दिला जातोय. अशात एक कार्बेट गन नावाचा प्रकार हल्ली ब-याच ठिकाणी दिसतोय, तो यासाठी चर्चेत आला की त्यामुळे अनेक ठिकाणी मुलांच्या डोळ्यांवर आघात होऊन डोळे काही प्रमाणात निकामी झालेली आढळत आहेत, म्हणून अशा विघातक वस्तूंची हौस काहिही झाले तरि पुरवू नका असे आवाहन जाणकारांकडून करण्यात येते आहे.
मध्य प्रदेशातील खरगोन येथे या अशा बंदुकी मुळे सहा मुलांचे दृष्टी वर परिणाम झाला, या बंदुकी मुळे त्या मुलांच्या डोळ्यातील कॉर्निया निकामी झाला. पैकी तीन मुलांवर इंदोर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलीस या गनची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांच्या तपासात आहे.
या गन ची निर्मिती पीव्हीसी पाईप ने केलेली असते, यात कार्बेट या रासायनिक पदार्थाचा तुकडा टाकलेला असतो ज्यावर पाण्याचा थेंब पडताच रासायनिक प्रक्रिया होऊन मोठ्या स्फोटा सारखा आवाज बाहेर येतो, व नळीवाटे पाणी टाकण्याच्या छिद्रावाटे धुरही बाहेर पडतो.
याचा वापर शेतातील जनावरे पळवण्यासाठी केला जात असतो, आवाजामुळे मुलांमध्येही ही बंदूक आवडीचा विषय ठरली आहे पण यातून निर्माण होणाऱ्या कार्बनचे उत्सर्जनाचा परिणाम थेट डोळ्यावरचा होत असल्याने ही बंदूक आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतेय. याशिवाय हिचा निर्मितीचा खर्च कमी असल्याने व बनावटही अतिशय सोपी असल्याने ठिकठिकाणी कोणीही उत्पादन करून रस्त्यांवर याची विक्री करू शकते, त्यामुळेच यांची उपलब्धता सहज होऊ शकते, मात्र हे घातक ठरतेय.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते यातील उपयोगात येणारा कार्बेट हा डोळ्यांच्या आरोग्यासाठी फारच घातक आहे. कार्बन गॅस डोळ्यात गेल्याने डोळ्यातील कॉर्णीया गळून जातो. त्यामुळे संबंधिताच्या दृष्टीवर परिणाम होतो. अशा घातक वस्तूंचा वापर टाळणे म्हणूनच महत्त्वाचे आहे. सुजाण पालकांनी याबाबत दक्ष व्हावे हेच योग्य.