बर्ड फ्लू इफेक्ट: नॉन व्हेजर्सची चिकनला नापसंती
नागपूर:- राज्यात बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याचे वृत्त आल्या ने खवय्यांनी चिकन व अंड्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे
याचाच परिणाम नागपुर मधील सावजी भोजनालयांवरही झालेल्या दिसून येतोय, चिकन अंडी विक्रीत कमालीची घट झाली आहे, विशेष म्हणजे चिकन अंडी खाणाऱ्यांची संख्याही कमालीची घटली आहे, याऐवजी मटन व शाकाहारास सर्वत्र प्राधान्य दिले जात आहे.
देशभरात अनेक ठिकाणी कावळे, कोंबड्या व अनेक पक्षी मरून पडल्याच्या बातम्या समोर येत आहे त्यामुळे नागरिकांनी तसे खाद्य दूर ठेवल्याचे चित्र समोर येत आहे, चिकन खाणा-यांची संख्या 60 ते 70 टक्क्यांनी कमी झाली आहे. बर्ड च्या भिती पोटी ग्राहक दिवसेंदिवस चिकन पासून लांब राहण्याचा प्रयत्न करताहेत असे चित्र आहे याबाबत विवीध माध्यमांवर जागरूकता करण्यात येत आहे, विशिष्ट तापमानापर्यंत शिजवलेले मांस हानिकारक ठरत नाही, केवळ कच्चे मांस खरेदि विक्री वेळी दक्षता बाळगावी असे सांगीतले जाते आहे मात्र लोक याबाबत सावध पवित्रा बाळगून आहेत