नागपूर: सिताबर्डीच्या उत्सवी खरेदीचा तुफान गर्दीचा व्हिडिओ, फोटो मिडीयावर नॅशनल व्हायरल झाल्यानंतर प्रशासन, यंत्रणेने तातडीने राबवलेल्या उपाययोजनांची बातमी आपणासाठी दिली होती, यातला आजचा अपडेट म्हणजे याऊपरही हि गर्दि आटोक्याबाहेर जात असल्याने प्रशासनाचे टेंशन
वाढले आहे. आज अधिक संख्येने जवान तैनात केले जाऊन परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले गेले.
दिवाळी खरेदीसाठी शहरातल्या प्रमुख बाजारपेठांत प्रचंड गर्दि होत आहे, कोरोना संसर्गाचा धोका विचारात घेता गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस व प्रशासनाने कंबर कसली आहे. धनत्रयोदशी हा दिवस खरेदीचा उत्तम मुहुर्त मानतात म्हणून या दिवसास होणारी संभाव्य खरेदि गर्दी नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे. यांचा विचार करता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सीताबर्डी, महाल, गांधीबाग भागाचा पुन्हा दौरा केला. गर्दिवर नियंत्रण ठेवण्यासाठी १५३ जवान तैनात करण्यात आले आहेत, तर सिताबर्डी बाजारात होणा-या गर्दिचा विचार करता प्रशासनाने अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी उपद्रव शोध पथकासह तैनात केले आहे, एन डि एस चे ४५ जवानांची तैनाती येथे केली गेली आहे.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हनुमान नगर 205 नेहरू नगर ते पाच गांधी यांचे पाचशे जवान तैनात करण्यात आले आहेत तरी फटका बाजारासाठी 35 जवान तैनात करण्यात आले आहे यात समावेश आहे मार्केटमध्ये नियंत्रणासाठी नेहरूनगर करण्यात आले आहे तसेच यासाठी करण्यात आले आहे दिवाळीपश्चातही ३ दिवस ते तैनातीवर असतील.
लक्ष्मी नगर झोनचे १५, धरमपेठ झोनचे २०, धंतोली झोनचे १० जवान तर ईतवारी, महाल, गांधीबाग बाजारांतील गर्दिवर नियंत्रण ठेवण्यासाठी हनुमान नगर झोनचे ५, नेहरू नगर झोनचे ५, गांधीबाग झोनचे ११ व लकड़गंज झोनचे ५ असे ३३ जवान तैनात केले गेले आहेत. कमाल चौक व जरिपटका बाजारासाठीही ३५ जवान तैनात केले आहे, यात आसिनगरचे १८, मंगळवारी झोनचे १७ जवानांचा समावेश आहे, सक्करदरा मार्केट गर्दि नियंत्रणास नेहरू नगर झोनचे २० जवान तैनात असतील, किराणा ओळ, रेशिम ओळ, भंडारा रोड बाजारातल्या गर्दी नियंत्रणासाठी सतरंजीपूरा झोनचे १५ व लकड़गंज झोनचे ५ जवान तैनात असतील.
प्रशासनाने त्याची यंत्रणा व्यवस्थित राबवून गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न केले आहेत, मात्र सर्वसाधारण खरेदीदाराने खरेदीसोबत आजार घरी आणत आहोत का? याचे भान राखणे आवश्यक आहे, सण उत्सवांस गालबोट लागू नये याची दक्षता घेणे अगदी आवश्यक आहे.