आजपासून घरोघरी पोचणार, भाजपा-मोदी सरकार
नागपूर:- मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील पहिले वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ शहर भाजपने या एका वर्षात घेतलेले ऐतिहासिक निर्णय घरोघरी पोहोचविण्यात येणार आहेत. 12 जून रोजी सकाळी 9 वाजता ही मोहीम सुरू केली जाईल, असे भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकांच्या माध्यमातून निर्णयांविषयीची माहिती लोकांना कळविली जाईल.
मोहिमेमध्ये रामदास आंबटकर, गिरीश व्यास, विकास महात्मे, अजय संचेती, अनिल सोले, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन माटे, सुधाकर देशमुख, मिलिंद माने, सुधाकर कोहळे, संदीप जाधव, मनीषा कोठे, विजय झलके नागरिकांशी संवाद साधून मोदींचा कार्यकाळाच्या निर्णयांची माहिती देतील
व्हर्चुअल जनसंवाद: दटकेंनी 30 जून रोजी पर्यंत अभियान सुरू रहाणार असल्याचे सांगितले. कोरोनामुळे, सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी लोकांचे घरी जाताना सोशल डिस्टंसिंगचे अनुसरण करतील. फक्त एक कार्यकर्ता जाईल. बूथ प्रमुखांनी स्वतःचे व्हाट्सएप ग्रुप तयार केलेयत आहे. व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे अन्य नेते शहरातील 1 लाख कुटुंबांना संबोधित करतील.