रविवार रोजी शिवसेना वतीने नागपूरात महारक्तदान शिबीर
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानामुळे कोरोना आटोक्यात येत असला तरी राज्यातील रुग्णालयांमधे रक्ताचा तुटवडा भासत असुन राज्यातील जनतेने स्वयंस्फुर्तीने पुढे येउन रक्तदान करावे असे आव्हान माननीय मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे व सम्माननीय.पर्यावरणमंत्री,युवासेना प्रमुख श्री.आदित्यसाहेब ठाकरे यांनी केले आहे.
तसेच शिवसेना नेते खासदार मा.श्री गजानन किर्तीकर साहेब,समपर्क प्रमुख दुष्यंतजी चतुर्वेदी, श्री.अमोल किर्तीकर साहेब, युवासेना सचिव श्री.वरुण सरदेसाई साहेब व यूवासेना कोर कमेटी सदस्य रूपेश कदम याच्या निर्देशानुसार व युवासेना नागपुर ज़िल्हा विस्तारक धरमजी मिश्रा याच्या नेतृत्वाखाली मध्य,उत्तर,पूर्व विधानसभा नागपुर तर्फे तुकडोजी हॉल , बिनाकी मांगलवारी येथे रविवार दि. १३ डिसेंबर २०२० स. १०:०० ते सायंकाळी 5:00 या कालावधीत महा रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते.
सुमारे 68 लोकांनी स्व-इच्छेने रक्तदान केले rainbow blood & component bank रक्तपेटी ने रक्त घेण्याचे काम केले.
यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रम राठोड, जिल्हा समन्वयक संदीप रियाल पटेल , धीरज फंदी, सलमान खान,निलेश तिघरे, राजे जयसिंग भोसले, धरम ठाकूर , छगन सोनवणे, शंतनू शिर्के , गणेश सोलंकी, यश जैन, बंटी धुर्वे, शुभम लखपती, पियुष कुहीकर, कौशिक येळने , संकेत बावणे,कार्तिक मार्कंडेय,संजय डोकरमारे, बबलू रोकडे, अनुराग लरोकर, निलेश निनावे, निलेश सतीबावणे, पंकज लांजेवार, अक्षय लक्षणे , इशांत गुंमगावकर, निलेश सावरकर , प्रतीक धुळे, आशिष कुथे, अनिल खाडखुरे,मयूर पाटिल, बादल बनसोड, कार्तिक सोनकुसरे , विकास मोटघरे, कृनाला सावरकर, अमोल निबळकर, अभिजित दारलिंगे, तुषार भुरे, राहुल जैन , हर्षल दारदेमल व अनेक युवसैनिक व पदाधिकार्यांनी रक्तदान करण्यात मदत केली.